शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार गुलाम अलींचा कार्यक्रम

By admin | Updated: October 15, 2015 19:00 IST

प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला शिवसेनेने केलेल्या तीव्र विरोधानंतरही आता दिल्लीत ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यक्रम होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला तीव्र विरोध करून शिवसेनेने तो रद्द करण्यास भाग पाडल्यावरून संपूर्ण देशात संतप्त वातावरण असतानाच आता राजधानी दिल्लीत ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यक्रम होणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मात्र शिवसेनेने हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा दिला आहे. 
८ नोव्हेंबर रोजी दिल्ली गुलाम अली साहेब यांचे स्वागत करेल, असे ट्विट करत मिश्रा यांनी ८ तारखेला दिल्लीत त्यांचा कार्यक्रम होईल हे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर तुम  नफरत फैलाते रहो, हम भाईचारा बढाते रहेंगे. तुम कांटे बोते रहो, हम फूल उगाते रहेंगे, असे त्यांनी म्हटले आहे.
गुलाम अली खान हे पाकिस्तानी असल्याने शिवसेनेने त्यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता, त्यानंतर मुंबई व पुण्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असताना, त्यांच्या गोळ्यांनी आपले जवान शहीद होत असताना आपण त्यांच्या कलाकारांना भारतात का बोलवायचे? असा सवाल विचारत शिवसेनेने कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. जोपर्यंत पाकिस्तान भारतातील हिंसाचार थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानचे कोणतेही कलाकार, क्रिकेटपटू यांना भारतात येण्यास परवानगी देऊ नये अशी भूमिका शिवसेनेन मांडली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सेनेच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता. 
मात्र कला व राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असून त्यांची गल्लत करू नये असे सांगत देशातील अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत नाराजी दर्शवली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुलाम अलींचा कार्यक्रम आयोजित  करण्यास स्वारस्य दाखवले होते. त्यानुसार आता दिल्लीत गुलाम अलींचा कार्यक्रम पार पडणार आहे.