नाशिक : भांडीबाजारातील बालाजी कोट येथील गायधनी वाड्यातील घराचे कुलूप तोडून सुमारे २० हजार रुपये किमतीची भांडी चोरून नेणार्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अलोक मोरेश्वर गायधनी (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रभाकर देवीदास घाडगे (२६, रा़ धानोरा, माळशीद, ता़ जळगाव जामोद, जि़ बुलढाणा) याने ३ ते ६ ऑगस्टदरम्यान बंद घराचे कुलूप व दरवाजा तोडून घरातील १९ हजार ७०० रुपयांचे ताब्या-पितळाचे भांडे चोरून नेले़ याप्रकरणी संशयित घाटगेविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
गायधनी वाड्यात घरफोडी
By admin | Updated: August 9, 2016 00:04 IST