शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

जिओला एअरटेलची ‘४जी डाटा’ची टक्कर

By admin | Updated: April 18, 2017 01:08 IST

रिलायन्स जिओने काही मोफत आणि काही अतिशय स्वस्त योजनांसह बाजारात उडी घेतल्यापासून, त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली असून

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने काही मोफत आणि काही अतिशय स्वस्त योजनांसह बाजारात उडी घेतल्यापासून, त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली असून, जिओला टक्कर देण्यासाठी अन्य टेलिकॉम कंपन्यांनीही तशाच योजना जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. कोट्यवधींचा टप्पा पार केल्यानंतर, जिओने मोफत सेवा बंद केली आणि प्राइम मेंबरशिपची आॅफर आणली. त्यालाही ग्राहकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. मग जिओने ‘समर सरप्राइज’ आॅफर बंद करून ‘धन धना धन’ ही आॅफर ग्राहकांसाठी सेवेत आणली. त्याचा फटका बसू नये, म्हणून एअरटेलनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ३ महिन्यांसाठी ४जी स्पीड आणि ३0 जीबी फ्री डाटा देण्याची घोषणा केली आहे.एअरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी आपल्या पोस्टपेड ग्राहकांना एक ईमेलच पाठवला आहे. पुढील तीन महिने मोफत डाटाचा लाभ घ्या, ही आॅफर तुमच्या लांब उन्हाळी सुट्ट्यांमध्येही सुरू राहील, असे गोपाल विठ्ठल यांनी ईमेलमध्ये नमूद केले आहे. जे ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग पॅक सक्रिय करू शकले नाहीत, त्यांना त्यांचे पैसेही परत मिळणार आहेत.या आधी रिलायन्स जिओच्या दोन्ही आॅफर्स एकसारख्या असल्यामुळे ‘धन धना धन’ ही आॅफर बंद करावी, अशी मागणी एअरटेलने ट्रायकडे केली होती. रिलायन्सच्या या आॅफरमुळे टेलिकॉम कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे एअरटेलच्या प्रवक्त्याने सांगितले होते. टेलिकॉम कंपन्यांची स्थिती अत्यंत वाईट असल्याने, इतर स्पर्धकांना अशी आॅफर देणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले होते. रिलायन्सने जिओ प्राइम मेंबरशिपसोबत दिलेली तीन महिन्यांची मोफत सेवा बंद करावी, असा आदेश दिल्यानंतर, रिलायन्सने नव्या रूपात पुन्हा जुनीच आॅफर ग्राहकांसाठी सेवेत आणली होती. या नव्या आॅफरचे नाव ‘जिओ धन धना धन’ आहे.जिओ ‘समर सरप्राइज’ आॅफरप्रमाणेच सर्व सुविधा या आॅफरमध्ये आहेत. जिओच्या नव्या आॅफरद्वारे तीन महिन्यांसाठी मोफत डाटा, सोबतच फ्री एसएमएस सेवा, जिओ अ‍ॅप सबस्क्रिप्शन मिळणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)