शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनरल सुहाग होणार नवे लष्करप्रमुख

By admin | Updated: May 14, 2014 00:48 IST

उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने मंगळवारी नियुक्ती केली. लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारतील.

नवी दिल्ली : उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने मंगळवारी नियुक्ती केली. लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारतील. भाजपाचा विरोध झुगारत आणि निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवताच सरकारने नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सुहाग यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या समितीने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. गुरखा रेजिमेंटचे अधिकारी असलेले ५९ वर्षीय सुहाग हे १२ लाख अधिकारी आणि जवान असलेल्या भारतीय लष्कराचे २६ वे प्रमुख असतील. त्यांना ३० महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर त्यांची निवड झाली आहे. चित्तोडगडच्या सैनिकी शाळेत शिकलेले सुहाग राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीतून १९७४ साली उत्तीर्ण झाल्यानंतर लष्करात दाखल झाले. श्रीलंकेतील भारतीय शांती सेनेतही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. जनरल सुहाग मूळचे हरियाणाच्या झाज्जर जिल्ह्यातील आहेत. भाजपाने नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीला जोरदार विरोध करताना नव्या सरकारला संबंधित निर्णय घेऊ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लष्करप्रमुखांच्या नियुक्तीस परवागनी देण्याची मागणी केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)