शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काळे कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाका नगरपालिकेची सर्वसाधारण सभा; नगरसेवकांची मागणी

By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST

१५पंड०५

१५पंड०५
पंढरपूर येथील नगरपालिकेच्या सभागृहात जनरल सभेत बोलताना नगरसेवक. (छाया - सचिन कांबळे)
पंढरपूर : शहरातील अनेक महिन्यांपासून रखडलेली रस्ता दुरुस्तीची कामे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने सुरु केली असून, ही कामे रात्रीच्या वेळी व निकृष्ट दर्जाची होत असल्याने या कामाचे ठेकेदार एस़आऱ काळे कन्स्ट्रक्शन यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली.
पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत ५७ विषय घेण्यात आले.
यावेळी नगरसेवकांनी नागरिकांतून शहरात सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाबद्दल तक्रारी येत असल्याचे सांगितले. भुयारी गटार योजना झाल्यामुळे अधिकारी नागरिकांना रस्त्यालगतच्या गटारी बुजविण्याचे आवाहन करत आहेत. यामुळे पावसाचे पाणी निचरा होण्यास अडचण निर्माण आहे. यामुळे अधिकार्‍यांनी नागरिकांची दिशाभूल करु नये असे सांगितले.
नगरपालिकेच्या सभागृहात व्यापार्‍यांची बैठक घेताना नगरसेवकांना का कळविले नाही?, संस्थेचे नुकसान होत असतानाही स्वच्छता सूचनेच्या डिजिटल बोर्डांचे बिल ठेकेदाराला देण्याच्या विषयाला सभेने नामंजुरी दिलेली असतानाही हे बिल अधिकार्‍यांनी का काढले? सुरवसे बिल्डिंग पाडण्याच्या कामाला नगरपालिकेच्या सभेत नामंजुरी दिली होती. भाविकांची शहरात गर्दी असताना देखील सुरवसे बिल्डिंग पाडण्यास अधिकार्‍यांनी परस्पर का मंजुरी दिली? असे प्रश्न सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अधिकार्‍यांना विचारले.
त्याचबरोबर महावीरनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करणे, नगरपरिषदेच्या रुग्णालयात नवीन शववाहिका खरेदी करणे, शहरातील भुयारी गटार चेंबरची उंची वाढविणे, आषाढी यात्रा कालावधीत विविध कामे करण्यासाठी येणार्‍या खर्चास मंजुरी देणे, दलित वस्तीतील रस्त्याचे कॉँक्रिटीकरण तसेच विविध ठिकाणच्या रस्त्याचे कॉँक्रिटीकरण यासह अन्य विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच कराड रोड पंतनगरमधून जाणारा विकास योजनेतील १५ मी. रुंदीचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या विषयाला स्थगिती देण्यात आली आहे.
नगरपालिकेचे वाचविले पैसे
यात्रा कालावधीत स्वच्छतेच्या सूचनांचे डिजिटल बोर्ड बनविण्यासाठी बाजारात कमी दर असताना देखील अधिकार्‍यांनी जादा दर ठेकेदाराला दिला होता. ही बाब नगरसेविका सविता मोहोळकर यांनी पुढे आणून याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली व डिजिटल बोर्डाचे बिल कमी दराने काढावे अशी विनंती केली. याची देखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी इतर ठिकाणी दराची चौकशी करुन संबंधित ठेकेदराचे बिल कमी दराने काढले. यामुळे नगरपालिकेचे १ लाख ६२ हजार रुपये वाचले. यामुळे सर्व नगरसेवकांनी सविता मोहोळकर यांचे अभिनंदन केले.
नवीपेठमध्ये निघणार गाळा
पंढरपूर शहर विकास योजना आरक्षण क्र. ६८ दुकान केंद्राचे (नवीपेठ) व आरक्षण क्र. २५ दुकान केंद्राचे बांधकाम बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर विकासाच्या कामास मंजुरी मिळाली आहे.