शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गायीने दिले ८१ वर्षाच्या वृद्धेला जीवनदान

By admin | Updated: July 16, 2015 15:23 IST

चेन्नईतील ८१ वर्षीय वृद्धेला गायीच्या ह्रदयाने जीवनदान दिले असून या महिलेला गायीच्या ह्रदयापासून तयार केलेले हार्ट व्हॉल्व लावण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. १६ - चेन्नईतील ८१ वर्षीय वृद्धेला गायीच्या ह्रदयाने जीवनदान दिले असून यावृद्धेला गायीच्या ह्रदयापासून तयार केलेले हार्ट व्हॉल्व लावण्यात आले आहे. या महिलेची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या या यशस्वी शस्त्रक्रियेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. 
चेन्नईतील ८१ वर्षीय महिलेच्या ह्रदयावर ११ वर्षांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. या महिलेला चेन्नईतील लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ११ वर्षांपूर्वी महिलेच्या ह्रदयाला जोडलेला एरोटिक व्हॉल्व पुन्हा एकदा संकुचित झाला होता. याच महिलेला काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरही झाला होता व त्यावेळी वृद्धेवर केमोथिरपीही झाली होती. अशी पार्श्वभूमी असलेल्या रुग्णावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसमोर अवघड आव्हान होते. मात्र लाईफलाइनमधील चार डॉक्टरांनी तब्बल तीन तासांच्या शस्त्रक्रियेत महिलेवर यशस्वी उपचार केले. या डॉक्टरांनी गायीच्या ह्रदयातील टिश्यूजपासून तयार केलेले हार्ट व्हॉल्वचे महिलेच्या ह्रदयात प्रत्यारोपण केले आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.