शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचा छळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 04:06 IST

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्यांपैकी चार आरोपींचा पोलिसांनी कोठडीत छळ केल्याची तसेच कायदेशीर तरतुदींचे पालन झाले नसल्याची तक्रार कर्नाटक उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्यांपैकी चार आरोपींचा पोलिसांनी कोठडीत छळ केल्याची तसेच कायदेशीर तरतुदींचे पालन झाले नसल्याची तक्रार कर्नाटक उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन न्याय दंडाधिकाऱ्यांकडून उच्च न्यायालयाने अहवाल मागवला आहे.न्या. के. एन. फणिंद्र यांनी सोमवारी या प्रकरणी १0 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम व तृतीय वर्ग अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाºयांना दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अमोल काळे याच्या वतीने अ‍ॅड. एन. पी. अमृतेश यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, पोलिसांनी अमोलला कोठडीत मारहाण केली, थोबाडीत मारले व गालावर ठोसेही लगावले. कोठडीत आरोपींशी कसे वागावे, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या तत्त्वांचे पालन करण्यात आलेले नाही.अमोल काळे, सुजीतकुमार, अमित डेगवेकर, मनोहर एडवे या चार आरोपींचे वकीलपत्र अ‍ॅड. एन. पी. अमृतेश यांनी घेतले आहे. काळेचा छळ पोलिसांनी केल्याची तक्रार १४ जून रोजी केली होती. मात्र अमोलची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश न देता त्याच्या अंगावर कुठेकुठे जखमा झाल्या आहेत, इतकाच तपशील न्यायदंडाधिकाºयांनी नोंदवून घेतला. अन्य तीन आरोपींचा जो छळ झाला त्याबद्दलची तक्रार ३१ मे रोजी न्यायदंडाधिकाºयांकडे करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)>वैद्यकीय तपासणी करांया चारही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश उच्च न्यायदंडाधिकाºयांना द्यावा अशी विनंती अ‍ॅड. अमृतेश यांनी केली.आरोपींना बेकायदेशीरपणे कोठडीत डांबण्यात आले असून, त्यांचा जो छळ होत आहे त्याची चौकशी व्हावी असेही ते म्हणाले. आरोपींची इन कॅमेरा जबानी नोंदविण्यात यावी व तसेच त्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई दिली जावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.