शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

मोदींच्या "या" धाडसी पावलाचं बिल गेट्स यांनी केलं कौतुक

By admin | Updated: April 26, 2017 14:02 IST

खुल्या जागेत शौचास जाणा-या लोकांना प्रतिबंद घालण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेवर भर देत खुल्या जागेत शौचास जाणा-या लोकांना प्रतिबंध घालण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा समस्येवर आवाज उठवला आहे ज्याबद्दल आपल्याचा विचार करणेसुद्धा आवडत नाही. तीन वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी जनतेच्या आरोग्यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली होती. ती आजतागायत कोणाच्याही तोंडून ऐकली नाही. आज त्याचा मोठा फायदा भारताला होतोय.

बिल गेट्स म्हणाले, आपण 21व्या शतकात राहतो. आजही आपल्या आया-बहिणी उघड्यावर शौचास जातात हे पाहून त्रास होत नाही का ? , गावातील अनेक महिला शौचास जाण्यासाठी रात्रीची वाट पाहतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल, त्यांना किती आजारांनी ग्रासलं असेल. आपण स्वतःच्या आया-बहिणींना डोळ्यांसमोर ठेवून शौचालय बांधू शकत नाही काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.माझ्या मते इतर कोणत्याही राष्ट्रीय नेत्यानं या संवेदनशील विषयावर इतक्या खुलेपणानं आणि सार्वजनिकरीत्या वाच्यता केली नाही. मोदींनी फक्त भाषणच दिलं नाही, तर विकासासाठी कामही केलं आहे. भाषणाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. त्याअंतर्गत 2019पर्यंत 7.5 कोटी शौचालय बांधण्याचा मोदींचा मानस आहे. तसेच त्यांनी खुल्यामध्ये कचरा फेकण्यासाठीही मनाई केली आहे. या समस्या सोडवून आपण हजारो जीव वाचवू शकतो. त्यामुळे मुली शाळेकडे आकर्षित होतील आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल. सफाईची स्थिती मजबूत बनवण्यासाठी आमची फाऊंडेशन जोमाने काम करते आहे. भारत सरकारसोबत मिळून आम्ही यावर काम करतो आहोत, असंही बिल गेट्स म्हणाले आहेत.