कचरा बातमी चौकट
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
26 जानेवारी नंतरही डेपोवर गाडी जाणार नाही
कचरा बातमी चौकट
26 जानेवारी नंतरही डेपोवर गाडी जाणार नाही उरूळी देवाची कचरा डेपो विरोधातील आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेतले असले, तरी, 8 जानेवारी नंतर पालिकेकडून डेपोवर एकही गाडी पाठविण्यात आलेली नाही. तसेच 26 जानेवारी पर्यंत कोणतीही गाडी न पाठविता शहरातच कचरा जिरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते. मात्र, आता 26 जानेवारी नंतरही डेपोवर गाडी जाऊ न देण्याच प्रशासनाचा निर्धार आहे. त्या अनुषंगाने शहरात वर्गीकरण तसेच प्रक्रीयेसाठी पालिकेने कंबर कसली असून त्यासाठी वीस ते तीस जागाही निश्चित केल्या आहेत. तसेच सोसायटयांमधील प्रकल्पही 100 टक्के सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.हे नियोजन यशस्वी झाल्यास डेपोवर केवळ प्रक्रीयेनंतर शिल्लक राहिलेले ईनटवेस्ट पाठविण्यात येणार असून ते सुध्दा कँपींगमध्ये घेण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.========================भंगार व्यवासायिकांना साकडे शहरात निर्माण झालेल्या सुक्या कच-यातील प्लास्टिक तसेच कागद घेऊन जाण्यासाठी महापालिकेकडून ओला कचरा घेऊन जाणा-या शेतक-यांप्रमाणेच भंगार व्यावसायिकांनाही साकडे घालण्यात येणार आहे. पालिकेने वर्गीकरण केल्यानंतर पुनर्वापर करता येणारा कचरा मोठया प्रमाणात निर्माण होत असून तो भंगार व्यावसायिकांनी घेऊन जावा अथवा हवा असल्यास महापालिका आणून देण्यास तयार असून त्यासाठी भंगार व्यावसायिकांनी महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे.===============================