शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत परदेशी महिलेवर गॅंगरेप, एक्स बॉयफ्रेंडला अटक

By admin | Updated: March 16, 2017 11:45 IST

राजधानी दिल्लीमध्ये उझबेकिस्तानच्या 36 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - राजधानी दिल्लीमध्ये उझबेकिस्तानच्या 36 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दक्षिण दिल्लीच्या मसूदपुर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या पूर्व प्रेमीला अटक करण्यात आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, 9 आणि 10 मार्चदरम्यान ही घटना घडली पण घाबरलेल्या महिलेने याबाबत तक्रार केली नव्हती. आपल्या एका ओळखीच्या व्यक्तिला महिलेने घडलेल्या घटनेबाबत सांगितलं त्यानंतर त्या व्यक्तिने पोलिसांत तक्रार केली. महिलेचा पूर्व प्रेमी आणि त्याच्या मित्रांनी हे दुष्कर्म केल्याचा महिलेचा आरोप आहे.
महिलेने केलेल्या आरोपानुसार, आधी तिला मारहाण करण्यात आली नंतर बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. अनुभव यादव हा तिचा पूर्व प्रेमी आणि त्याचा मित्र गौरव भाटिया अशी आरोपींची नावं असल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं तर इतर आरोपींना ओळखत नसल्याचं तिने म्हटलं आहे.  
यादव आणि पीडित महिला गेल्या 4 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते पण दोन आठवड्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर यादव तिला फोन करून धमकावत होता अशी तक्रार महिलेने केली आहे.