वैजापूरने पळविले गंगापूरचे पाणी
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
गंगापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यातील पाणी टेल टू हेड या नियमाला फाटा देऊन पुन्हा वैजापूरकरांनी संबंधितांना हाताशी धरून गंगापूर तालुक्याच्या वाटेचे पाणी पळविले. आठ दिवस चालणारे पाण्याचे आवर्तन तीनच दिवसांत संपले.
वैजापूरने पळविले गंगापूरचे पाणी
गंगापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यातील पाणी टेल टू हेड या नियमाला फाटा देऊन पुन्हा वैजापूरकरांनी संबंधितांना हाताशी धरून गंगापूर तालुक्याच्या वाटेचे पाणी पळविले. आठ दिवस चालणारे पाण्याचे आवर्तन तीनच दिवसांत संपले.रबी हंगामासाठी नांदूर-मधमेश्वर कालवा विभागाने गंगापूर तालुक्यातील नांमका लाभक्षेत्रासाठी पाणी सोडले. सदरचे ९ दिवसांकरिता व तेही टेल टू हेड या नियोजनाच्या अधीन राहून सोडण्यात आले होते. वैजापूर तालुक्यातील शाखा क्रमांक ७ ते २८ पर्यंत सर्व चार्या-पोटचार्या, तसेच प्रमुख एक्स्प्रेस कालव्यात ६ ते ७ इंची पीव्हीसी पाईप टाकून, तर कुठे चारीचे गेट वर करून गंगापूरच्या हक्काच्या पाण्याची वाटमारी करण्यात आली.नांदूर-मधमेश्वर कालव्याचे कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर यांच्या भोंगळ कारभारामुळेच धनदांडग्यांनी टेल टू हेड नियम धाब्यावर बसविला, असा आरोप गंगापूर तालुक्यातील लाभधारक शेतकर्यांनी केला आहे. यात झोडेगाव पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष सुभाष ठाकरे, संचालक सोमनाथ तांबे, सुरेश शेजूळ, बद्रीनारायण नरोडे यांचा समावेश आहे.