शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गंगा-यमुनेला न्यायालयानं ठरवले 'जिवंत व्यक्ती'

By admin | Updated: March 21, 2017 12:54 IST

उत्तराखंड उच्च न्यायालयानं गंगा ही भारताची पहिली लिव्हिंग एंटिटीस म्हणजेच जिवंत व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमतनैनिताल, दि. 21 - गंगा आणि यमुना या नद्या पवित्र समजल्या जातात. हिंदूमध्ये गंगा नदीची देवीच्या रुपात पूजा केली जाते. असं म्हणतात, गंगेत डुबकी मारल्यानं सगळी पापं धुतली जाऊन त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. हरिद्वार, इलाहाबाद आणि वाराणसी सारख्या हिंदूंची पवित्र ठिकाणं ही गंगेच्या किनारीच वसलेली आहेत. गंगोत्री, यमुनोत्रीच्या सुपीक खोऱ्यांतच अनेक मानवी संस्कृती उदयास आल्या. इतिहासानुसार गंगा पर्वतांचे राजा हिमावन आणि त्यांची पत्नी मीना यांची पुत्री आहे. हाच धागा पकडत उत्तराखंड उच्च न्यायालयानं सोमवारी गंगा, यमुना देशातल्या प्रमुख नद्यांबाबत ऐतिहासिक निकाल दिला आहे.उत्तराखंड उच्च न्यायालयानं गंगा ही भारताची पहिली लिव्हिंग एन्टिटी म्हणजेच जिवंत व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यापुढे गंगा आणि यमुनेला एखाद्या जिवंत व्यक्तीप्रमाणेच सर्व घटनात्मक अधिकार मिळणार आहेत. आता गंगेचं प्रदूषण करणे हे जिवंत व्यक्तीला नुकसान करण्यासारखं मानलं जाईल. न्या. संजीव शर्मा, न्या. आलोक सिंह यांनी हा निकाल दिला आहे. हरिद्वारच्या मोहम्मद सलीम यांची यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तत्पूर्वी न्यायालयानं उत्तराखंड आणि केंद्र सरकारला याच मुद्द्यावरून फटकारलं होतं. गंगेचं शुद्धीकरण करून तिला वाचवण्यासाठी सरकार कोणतेच प्रयत्न करत नाही. गंगेची काळजी घेतल्यास तिचं गेलेलं वैभव तिला परत प्राप्त होऊ शकतं, असंही न्यायालयानं सुनावणीत म्हटलं आहे. गंगेला लवकरात लवकर स्वच्छ न केल्यास उत्तराखंड सरकार बरखास्त करू शकतो, गंगास्वच्छतेच्या मुद्द्यावर सरकारच्या निष्काळजीपणाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरकार गंगेस स्वच्छ प्रवाही बनवण्यात अयशस्वी ठरल्यास न्यायालय आपल्या शक्तींचा वापर करून कलम 365 नुसार सरकार बरखास्त करू शकते. केंद्राला आठ आठवड्यांत गंगा व्यवस्थापन मंडळ स्थापण्याचे निर्देशही दिले. विशेष म्हणजे उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निकालाआधीच पाच दिवस न्यूझीलंडने जगात पहिल्यांदाच वाननुई नदीस जिवंत व्यक्ती मानले होते. नदी आपल्या प्रतिनिधीद्वारे बाजू मांडू शकते. त्यानंतर गंगा संरक्षण मंत्री उमा भारतींनीही प्रतिक्रिया दिली आहे. गंगा स्वच्छतेला आठ महिने उशीर झाला. 16 ऑक्टोबर 2017ची मुदत आम्ही निश्चित केली होती. मात्र, या तारखेपर्यंत काम पूर्ण होऊ शकणार नाही. तरीही वर्षाच्या आत काम संपवू, असंही त्या म्हणाल्या आहेत.