शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

घरफोडी करणारी महिलांची टोळी जेरबंद गुन्हा उघडकीस : सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे अडकल्या जाळ्यात

By admin | Updated: February 14, 2016 00:41 IST

फोटो

फोटो
जळगाव: कचरा वेचण्याच्या नावाखाली दिवसा घरफोडी करणार्‍या टोळीचा शनिवारी रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रचना अनिल खलसे (वय २२), लता सदाशिव खंडारे (वय ४४), रंजना सुरेश रनसिंग (वय ३५),कल्पना धनराज हातांगळे (वय २१) व जमनाबाई गोरख कांबळे (वय ४५) (सर्व रा.राजीव गांधी नगर,जळगाव)या पाच महिलांना जेरबंद करण्यात आले आहे. दरम्यान, चोरीचे दागिने घेणारे महेशकुमार रमेशचंद्र वर्मा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या दोन दिवसात गुन्हा उघडकीस आला आहे.
या पाचही महिलांनी पाच फेब्रुवारी रोजी सतीश पंडितराव दामोदरे (वय ४६ रा. नुतन वर्षा कॉलनी) यांच्या लोंखडी दरवाजाचे कुलूप तोडून एक लाख ५५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या,चांदीचे दागिने भरदिवसा लांबविले होते. दामोदरे हे पत्नीसह उत्तरकार्याच्या कार्यक्रमासाठी असल्याने ते ब्रुक बॉँड कॉलनीत गेले होते. त्यांच्या शेजारी राहणार्‍या मंजू सतीश मंगल यांनी दुपारी दोन वाजता दामोदरे यांना फोन करून जीन्याच्या लोखंडी प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले असून दरवाजा अर्धवट उघडे असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दोघांनी तातडीने घर गाठले असता बेडरुमधील दोन्ही लोखंडी कपाट उघडे होते तर त्यातील लॉकरमधील दागिने गायब झाल्याचे दिसून आले.
रिक्षा चालकाची झाली मदत
गुन्हा दाखल झाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वत: घराची पाहणी केली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांना तपासाबाबत काही सूचना केल्या होत्या. या तपासासाठी वाडीले यांनी उपनिरीक्षक सुजाता राजपूत, शामराव पवार, महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विजय खैरे, सुरेश मेढे, तृप्ती नन्नवरे, निलोफर सैयद व सुवर्णा तायडे आदींचे पथक कार्यान्वित केले. हे पथक वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करत असताना घटनास्थळावरील दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन महिला संशयास्पद जाताना व येताना दिसून आल्या. ते फुटेज घेऊन चौकशीचे सूत्रे फिरवली असता देशमुख नावाच्या तरुणाच्या रिक्षातून ते अजिंठा चौकात गेल्याचे निष्पन्न झाले. त्याने दिलेले व अन्य ठिकाणावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचा राहण्याचा ठिकाणा पोलिसांनी शोधला.