शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

By admin | Updated: June 21, 2017 01:36 IST

येथून अपहरण करण्यात आलेल्या ३५ वर्षीय महिलेला मंगळवारी पहाटे ग्रेटर नोएडात कारमधून फेकण्यात आले

गुडगाव : येथून अपहरण करण्यात आलेल्या ३५ वर्षीय महिलेला मंगळवारी पहाटे ग्रेटर नोएडात कारमधून फेकण्यात आले. ही कार नंतर राजधानीच्या परिसरात (एनसीआर) फिरत राहिली आणि कारमधील तीन लोकांनी महिलेवर कथितरीत्या आळीपाळीने अनेक तास सामूहिक बलात्कार केला. महिनाभरापूर्वीच आयएमटी मानेसर येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वांना हादरवून सोडले होते. पीडित महिलेला ग्रेटर नोएडातील ‘चाचा का धाबा’च्या समोर सकाळी चार वाजता फेकण्यात आले. या महिलेचे गुडगावच्या सोहना भागातून अपहरण करण्यात आले होते. ते ठिकाण येथून भरपूर दूर आहे. या महिलेचे सोहना भागातून काल रात्री आठ वाजून ४५ मिनिटांनी अपहरण करण्यात आले होते आणि अनेक तासांनंतर स्विफ्ट कारमधून आज सकाळी तिला रस्त्यावर फेकण्यात आले. पीडित महिलेने स्थानिक लोकांना तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. लोकांनी गौतम बुद्धनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी बीअरच्या काही बाटल्याही आढळून आल्या आहेत. त्यावरून असे दिसते की, आरोपी मद्यधुंद होते. आम्ही या महिलेचा जबाब नोंदवून घेत आहोत, असे ग्रेटर नोएडाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ही महिला मूळची राजस्थानातील भरतपूरची रहिवासी आहे. सोमवारी रात्री सोहनाजवळील आपल्या नातेवाईकांच्या घराजवळ फेरफटका मारत असताना काही लोकांनी मला कारमध्ये ओढले. ते लोक तिचा विनयभंग करू लागले आणि नंतर चार ते पाच तास त्यांनी तिच्यावर बलात्कार केला.दिल्लीहून हे लोक ग्रेटर नोएडा येथे गेले. तेथे अंधार असलेली जागा पाहून त्यांनी महिलेला कारमधून बाहेर फेकले आणि फरार झाले. घटनेची माहिती पोलिसांना दिली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांनी या महिलेला दिली.