शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलीला रिक्षेतून फेकलं

By admin | Updated: June 6, 2017 10:49 IST

शेजाऱ्यांशी भांडण झाल्यामुळे आपल्या ८ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी जायला निघालेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

गुरूग्राम, दि. 6-  शेजाऱ्यांशी भांडण झाल्यामुळे आपल्या ८ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी जायला निघालेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर रिक्षेत बसलेल्या महिलेच्या हातातून तिच्या आठ महिन्याच्या मुलीला खेचून आरोपींनी चालत्या रिक्षेतून तीला बाहेर फेकून दिलं. त्यावेळी फुटपाथवर डोक आपटलं गेल्यानं त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. ​नंतर त्या नराधमांनी एका सामसूम जागी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार करून ते पळून गेल्याचं समोर आलं आहे. 
 
पीडित महिला आपल्या पतीसोबत बासकुसला गावात राहणारी होती. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारात तिच्या पतीचं शेजाऱ्यांशी जोरदार भांडण झालं. त्यानंतर नाइट शिफ्ट असल्याने तो कामावर निघून गेला. पीडित महिलेचा पती कामावर गेल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पुन्हा महिलेशी भांडण सुरू केलं. भांडणाला कंटाळून महिला आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी जाण्यासाठी निघाली होती. ती आयएमटी चौकात पोहचली. पण रात्री रस्त्यावर कोणतंही वाहन न दिसल्याने तिने एका ट्रकवाल्याकडून लिफ्ट मागितली. ट्रकमध्ये बसल्यावर चालकाने महिलेची छेडछाड सुरू केली. शेवटी ती महिला पुढे खेडकीदौला टोलनाका येताच उतरून गेली. टोलनाक्यावरून तिने एक रिक्षा पकडली होती. त्या रिक्षेत आधीच तीन तरुण बसले होते. तरीही माहेरी लवकर पोहोचता यावं म्हणून ती महिला त्या रिक्षेत बसली. मुलीला मांडीवर घेऊन रिक्षेमध्ये बसताच त्या तीन तरुणांनी महिलेची छेड काढायला सुरुवात केली. तिने आरडाओरडा सुरू करताच तिची मुलगीही घाबरून रडायला लागली. त्याबरोबर त्या तरुणांनी मुलीला महिलेकडून खेचून घेत चालत्या रिक्षेतून फेकून दिलं. त्यानंतर एका अज्ञात जागी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार करून ते पळून गेल्याचा आरोप महिलेने केला आहे. तशाच अवस्थेत पीडित महिला माहेरी पोहचली.  याप्रकरणी पीडित महिलेने आयएमटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात मुलीच्या खुनाचा गुन्हा नोंदविला.  पण हे सगळं सुरू असताना त्या महिलेने तिच्यावर बलात्कार झाला असल्याचं सांगितलंसुद्धा नाही. दोन दिवसांनी तिने  याविषयी आपल्या पतीला सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.