दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
पुणे : कोथरुडमधील स्टेट बॅंकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला कोथरुड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.
दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड
पुणे : कोथरुडमधील स्टेट बॅंकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला कोथरुड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.लक्ष्मण उर्फ लखन मधु ढावरे (वय २३), गणेश उर्फ प्रेम्या इराण्णा हलगेनुर (वय २२), नितीन व्यंकटेश भंडारी (वय १९), चोट्या उर्फ तिरुपती जयराम राठोड, बोक्या उर्फ विकी रमेश पवार (सर्व रा. लक्ष्मीनगर झोपडपट्टी, डहाणुकर कॉलनी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील ढावरे, नितीन, चोट्या या तिघांना अटक करण्यात आली असून बोक्या आणि चोट्या पसार झाला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार जी. काळे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी कोथरुड परीसरात दरोडा टाकणार असल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डहाणूकर कॉलनीमधील रोहन प्रार्थना बिल्डींगमधील स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या एटीएम सेंटरसमोरील मोकळ्या जागेत छापा टाकून आरोपींना जेरबंद केले.आरोपींकडून कोयता, कुकरी, मिरची पुड, स्क्रु ड्रायव्हर, दोरी, चिकटपट्ट्या जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अतिरीक्त पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त एम. बी. तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.