शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंती

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

महात्मा फुले शिक्षण संस्था

महात्मा फुले शिक्षण संस्था
नागपूर : महात्मा फुले शिक्षण संस्थतर्फे परिसर स्वच्छता हा कार्यक्रम राबवून महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, सचिव सुरेंद्र आर्य, कार्याध्यक्ष शेषराव उमप, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, रविंद्र अंबाडकर, प्रा. मुकेश घोळसे, राजेंद्र पाटील, शरद चांदोरे, घनश्याम खवले, विनायक गवडी, राजू गाडगे, शंकर घोळसे, डॉ. रुपराव गहुकर, माधवराव घोळसे, आदी उपस्थित होते.
इंदिरा गांधी हायस्कूल
नागपूर : राष्ट्रीय स्नेही शिक्षण संस्थेद्वारे संचालित विविध शाळांच्यावतीने जुना सुभेदार ले-आउटच्या इंदिरा गांधी हायस्कूल येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव सुरेश धावडे उपस्थित होते. प्रास्ताविक जी.एस. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पालवे यांनी तर आभार प्रदर्शन एस.पी. काळे यांनी केले.
शकुंतला पब्लिक स्कूल
नागपूर : शकुंतला मल्टिपरपज सोसायटीद्वारे संचालित शकुंतला पब्लिक स्कूल आणि बारक्लेज प्ले हाऊस यांच्यातर्फे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे संचालक सुनील आर. शेंडे, मुख्याध्यापिका वर्षा शेंडे, भिवगडे, कुंदर, वाघ व डी.सी. टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शैलजा व स्मिता यांनी केले. सीमा यांनी आभार मानले.
रिपब्लिकन पक्ष(खोरिपा)
नागपूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्ष(खोरिपा)च्या वतीने चितार ओळी चौक, सी.ए. रोड येथील गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. प्रदीप बोरकर, पांडुरंग बोरकर, ओमप्रकाश सोमकुवर, रामभाऊ मेश्राम, उज्ज्वला बोरकर, हेमराज चिचखेडे, अरुण मेश्राम, सुधीर पाटील, ॲड. जिजा सोमकुवर, आदी उपस्थित होते.
विठ्ठलराव चामट हायस्कूल
नागपूर : विठ्ठलराव चामट हायस्कूल व प्राथमिक शाळेच्यावतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रभातफेरी व कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कल्पना मुंगले, विमल लेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. मोहन तेलरांधे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन वनमाला रामटेके यांनी केले. रमेश इखारकर यांनी आभार मानले.