शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

देशभरातील ९६७ पोलीस कर्मचा-यांना शौर्यपदक जाहीर

By admin | Updated: January 26, 2015 03:30 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९६७ पोलीस कर्मचा-यांना रविवारी पोलीस शौर्यपदक जाहीर झालीत़ महाराष्ट्रातील हेडकॉन्स्टेबल गणपत नेवरू मडावी यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले़

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९६७ पोलीस कर्मचा-यांना रविवारी पोलीस शौर्यपदक जाहीर झालीत़ महाराष्ट्रातील हेडकॉन्स्टेबल गणपत नेवरू मडावी यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले़ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा केली़ अधिकृत माहितीनुसार, यापैकी २५ पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, १३२ जणांना पोलीस शौर्यपदक, ९८ जणांना विशेष उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि ७१२ पोलीस कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहे़२६ कारागृह कर्मचा-यांना राष्ट्रपती सुधारक सेवापदक देशभरातील २६ कारागृह कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारक सेवापदक (करेक्शनल मेडल) जाहीर झाले आहे़ यात पुण्याच्या येरवडास्थित जाधव कारागृह अधिकारी प्रशिक्षण कॉलेजचे हवालदार रवींद्र राम पवार, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील जेलर (श्रेणी २) तात्यासाहेब सदाशिव, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार संजीत रघुनाथ कदम, कोल्हापूरच्या जिल्हा कारागृहाचे शिपाई दिगांबर सदाशिव विभुती या महाराष्ट्रातील चार कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़५६ जणांना जीवनरक्षा पदकराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१४ साठी दिल्या जाणाऱ्या जीवनरक्षा पदक पुरस्कारांसाठीच्या ५६ लोकांच्या नावांना आज रविवार मंजुरी दिली़ यापैकी चौघांना सर्वोत्तम जीवनरक्षा पदक, १७ लोकांना उत्तम जीवनरक्षा पदक आणि ३५ लोकांना जीवन रक्षक पदक दिले जाणार आहे़ २७ लोकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे़ महाराष्ट्रातील रमेश शशिकांत पवार (मरणोत्तर), गणेश अहिराव (मरणोत्तर) यांना उत्तम जीवनरक्षा पदक जाहीर झाले आहे़ महाराष्ट्राचेच जितेश मधुकर काळे यांना जीवनरक्षा पदक जाहीर झाले आहे़ एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविण्याचे मानवीय कार्य करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)विविध पुरस्कार मिळालेल्या महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणेगिरीधर नागो आत्राम (मरणोत्तर), पोलीस नाईकमोहंमद सुवेज मेहबूब हक, पोलीस अधीक्षक यशवंत अशोक काळे, पोलीस उपअधीक्षकप्रकाश व्यंकट वाघमारे, पोलीस उपनिरीक्षकसदाशिव लखमा मडावी, पोलीस नाईकगंगाधर सिडाम, पोलीस नाईकमुरलीधर सखाराम वेलादी, पोलीस कॉन्स्टेबलअतुल श्रावण तावडे, पोलीस उपनिरीक्षकअंकुश शिवाजी माने, पोलीस उपनिरीक्षकविनोद हिचामी, पोलीस नाईकसुनील तुकडू मडावी (मरणोत्तर), पोलीस कॉन्स्टेबलराजेंद्र कुमार तिवारी, सहायक पोलीस निरीक्षकसंदीप म्हस्के, पोलीस उपनिरीक्षकअविनाश गडख, पोलीस उपनिरीक्षकरमेश येडे, हेडकॉन्स्टेबलवामन सहदेव पारधी, पोलीस नाईक -राधेश्याम सीताराम गाते, पोलीस नाईक - उमेश भगवान इंगळे, पोलीस नाईक