गजानन महाराज प्रगट दिन-जोड
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
जोड...
गजानन महाराज प्रगट दिन-जोड
जोड... संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव --------- श्री संत गजानन महाराज संस्थान, दिघोरी श्री संत गजानन महाराज संस्थान दिघोरी(धन्वंतरीनगर) येथे संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पालखी यात्रा काढण्यात आली. टेलिफोननगर, उमरेड रोड, नरसाळा रोड आदी मार्गे ही यात्रा निघाली. सायंकाळी हवन, गोपालकाला आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी सचिन शेंडे, राहुल अनंतवार, ॲड. आशिष शेंडे, प्रतीक चकोले, आकाश सुरमवार, शुभम अतकरी आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर महाराज मंदिर, बजाजनगर बजाजनगर येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कुमुदिनी देशपांडे यांनी कीर्तन सादर केले. आरती दिवे यांनी भक्तिगीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.