गजानन महाराज प्रगटदिन
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
महेशनगरात आठ ते दहा हजार भाविकांना महाप्रसाद
गजानन महाराज प्रगटदिन
महेशनगरात आठ ते दहा हजार भाविकांना महाप्रसादनागपूर : गजानन महाराज प्रगटदिनाचा कार्यक्रम महेशनगर (अनंतनगर) येथील मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. इंदिराबाई बारब्दे आणि तुकारामजी बारब्दे यांनी १५ वर्षांपूर्वी गजानन महाराजांचे छोटेसे मंदिर बांधून महेशनगरात प्रगटदिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आता या कार्यक्रमाचे स्वरूप भव्य झाले आहे. बुधवारी सकाळी अभिषेक, पूजा अर्चना झाल्यानंतर दुपारी श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो भाविक सहभागी झाले होते. सायंकाळी पालखीचा समारोप झाल्यानंतर रात्री ७ ते १२ पर्यंत सुमारे ८ ते १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलकंठ बारब्दे, विलास बारब्दे, मनोज ढोमणे, आशिष ढोमणे, महेश भोयर, कुणाल आवारे, वैष्णवी भोयर आदींनी विशेष परिश्रम घेतले. ---- (फोटो : एनडोंगरे/१२पालखी-१/ १२पालखी-२)