गजानन महाराज पारायण
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
फोटो : गजानन महाराज
गजानन महाराज पारायण
फोटो : गजानन महाराज श्री संत गजानन महाराज सेवा समितीतर्फे पारायण नागपूर : श्री संत गजानन महाराज सेवा समिती, टिमकीच्यावतीने रविवारी दि. २५ रोजी श्री गजानन विजयग्रंथाचे पारायण, सत्संग, आरती तसेच समितीच्या सर्व सेवाधारी महिलांचे सामूहिक हळदी-कंुकू व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री रेणुका माता मंदिर, गांधी पुतळा चौक, सी.ए. रोड येथे सकाळी ९.३० पासून कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई पेशवे, स्त्री रोग तज्ज्ञ श्रीमती माला इंगळे संबोधित करणार आहेत. गजानन महाराज सेवा समितीच्या सर्व सेवाधारी सदस्यांनी यावेळी परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन सेवाधारी सदस्य व प्रचार प्रमुख श्याम गडवे यांनी केले आहे.