शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भावी पोलिसांची कडक उन्हात कसोटी! पोलीस भरती प्रक्रिया : पहिल्या दिवशी ३७९ पुरूष उमेदवारांची हजेरी

By admin | Updated: March 30, 2016 00:24 IST

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील ६२ जागांसाठी मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना भरती प्रक्रियेबाबत केलेल्या सूचना व प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या नियोजनात पहिल्या दिवशी गडबड झाल्याने दुपारी ११ वाजेपर्यंत उमेदवारांची कडक उन्हात मैदानी चाचणी घेण्याची वेळ आली. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. आपले भविष्य सुखकर होण्यासाठी अनेक तरुणांनी भर उन्हातही स्वत:ला झोकून देत मैदानी चाचणीत चांगले गुण मिळवण्यासाठी धडपड केली.

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील ६२ जागांसाठी मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना भरती प्रक्रियेबाबत केलेल्या सूचना व प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या नियोजनात पहिल्या दिवशी गडबड झाल्याने दुपारी ११ वाजेपर्यंत उमेदवारांची कडक उन्हात मैदानी चाचणी घेण्याची वेळ आली. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. आपले भविष्य सुखकर होण्यासाठी अनेक तरुणांनी भर उन्हातही स्वत:ला झोकून देत मैदानी चाचणीत चांगले गुण मिळवण्यासाठी धडपड केली.
पोलीस दलातील ६२ जागांसाठी एकूण आठ हजार ७३२ उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. त्यातून पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३८० उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. त्यातून एका उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याला पोलीस मैदानाच्या प्रवेशद्वारावरूनच बाहेर काढण्यात आले. त्यामुळे ३७९ उमेदवारांना कागदपत्र तपासणी, शारीरिक व मैदानी चाचणीसाठी मैदानावर प्रवेश देण्यात आला.
सुरुवातीला कागदपत्रांची तपासणी
भरती प्रक्रियेत सुरुवातीला उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रे असणार्‍या उमेदवारांची लागलीच छाती व उंची मोजण्यात आली. शारीरिक चाचणीत पात्र ठरणार्‍या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी मैदानावर सोडण्यात आले. त्याठिकाणी उमेदवारांची १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, पुलअप्स काढणे अशा स्वरुपाच्या चाचण्या घेण्यात आल्या. प्रत्येक टप्प्यातील सर्व उमेदवारांची १६०० मीटर धावण्याची चाचणी स्वतंत्ररित्या दुसर्‍या दिवशी सकाळी पोलीस मैदान क्रमांक दोनवर घेण्याचे ठरले आहे.
भरती प्रक्रियेवर १२ सीसीटीव्हींची नजर
भरती प्रक्रियेच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी १२ सीसीटीव्ही कॅमेरे (प्रत्येक कॅम्पवर एक) लावण्यात आलेले आहेत. या सर्व कॅमेर्‍यांच्या नियंत्रणासाठी पोलीस मैदानावर एक स्वतंत्र व्हीआयपी कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात स्वत: पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे हजर राहून मार्गदर्शन करतात.
पारदर्शक प्रक्रिया
भरती प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रत्येक उमेदवारांच्या चाचणीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक चाचणीनंतर उमेदवाराने मिळवलेले गुण त्याच्या समक्ष यादीत लिहून त्यावर उमेदवाराची स्वाक्षरी घेतली जात आहे. उमेदवाराला काही शंका असल्यास त्याला अपील करण्याची मुभादेखील आहे. नियोजनाचे काम जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील व पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोनवणे पाहत आहेत.