शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी मधील फुटीवर युतीच्या किल्ल्याचे भवितव्य

By admin | Updated: September 26, 2014 00:08 IST

युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे

वाडा : शिवसेना-भाजपा युतीचे वर्चस्व असलेल्या भिवंडी ग्रामीण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुट करून भाजपात प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचा एक गट तर भाजपा मधील निष्ठावंताचा एक गट असे दोन गट तयार झाल्याने ते एकत्र येऊन कितपत लढत देऊ शकतात. यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे.एकेकाळी काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या पूर्वीचा वाडा विधानसभा क्षेत्र तर आत्ताचा भिवंडी ग्रामीण मतदार संघ गेल्या २५ वर्षांत युतीने काबीज करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नागरीकरण झालेल्या भागात युतीने चांगला जम बसविला असला तरी ग्रामीण भागात युतीला पाहिजे तशी पकड बसविता आलेली नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत युतीला बहूमत मिळविता आले नाही तर काँग्रेसला आपली ताकद दाखविता आली नाही. मात्र राष्ट्रवादीने जिल्हापरिषदेवर आपला झेंडा कायम ठेवला आता मात्र पक्ष फुटीमुळे इतर भागांप्रमाणेच भिवंडी ग्रामीण मतदार संघात राजकीय समीकरणेही आता बदलली आहेत.पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड होती. परंतु जिल्हा विभाजनाने पालघर जिल्ह्यात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतील असे चित्र दिसत आहे. मात्र आयाराम-गयारामांचा युतीला कितपत फायदा होतो ते निष्ठेने काम करतील का? कारण हे कार्यकर्ते ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या विरोधात त्यांनी काम केले असल्याचे जाणकारांचे म्हणणे ाहे. भाजपाच्या २५ वर्षांच्या राजवटीला जनता कंटाळली असून त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अतिश पाटील यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नेत्यांमुळे या मतदार संघात चुरस वाढली आहे. त्यामुळे विष्णू सवरांना भाजपा तारणार की पाडणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. (वार्ताहर)