शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

निधी बँकेत जमा करा; राजकीय पक्षांना बडगा

By admin | Updated: August 30, 2014 02:42 IST

राजकीय पक्षांना आपला निधी बँकांमध्ये जमा करणे अप्रत्यक्षरीत्या बंधनकारक करणारा आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केला

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना आपला निधी बँकांमध्ये जमा करणे अप्रत्यक्षरीत्या बंधनकारक करणारा आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केला. उमेदवारांना पक्षाकडून अर्थसाहाय्य देताना खर्चाची कमाल मर्यादा ओलांडली जाऊ नये. तसेच निधीबाबत पारदर्शकता, उत्तरदायित्व बाळगले जावे, असे आयोगाने म्हटले.निवडणूक खर्चासाठी पक्षनिधीचा वापरताना पारदर्शकता, जपण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा एक भाग म्हणून आयोगाने कलम ३२४ अन्वये आदेश दिला आहे. निवडणुकीवर देखरेख, मार्गदर्शन तसेच नियंत्रणाबाबत हे कलम आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांच्या कोषाध्यक्षांना प्रदेश आणि निम्न स्तरावरील सर्व खात्यांसह केंद्रीय मुख्यालयाच्या संयुक्त खात्याचा लेखाजोखा ठेवणे क्रमप्राप्त राहील. चार्टर्ड अकाउंटन्टस् संस्थेने खात्यांच्या हिशेबाबत दिलेल्या मार्गदर्शक संहितेनुसार हा लेखाजोखा असावा. कोणतीही व्यक्ती किंवा कंपनीला २० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम देऊ नये. बँक नसलेला ग्रामीण भाग मात्र त्याला अपवाद असेल. पक्षाचे पदाधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वेतन, निवृत्तीवेतन किंवा मेहनताना देताना रोख रक्कम द्यावी लागत असेल तर ती बाबही ग्राह्य धरण्यात आली आहे.