पाच हजार शेतकऱ्यांना वैरणासाठी अनुदान
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
दूध उत्पादनाला चालना : कृषी समितीच्या बैठकीत निर्णय
पाच हजार शेतकऱ्यांना वैरणासाठी अनुदान
दूध उत्पादनाला चालना : कृषी समितीच्या बैठकीत निर्णयनागपूर : जिल्ह्यातील दूध उत्पादनवाढीला चालना मिळावी, यासाठी संकरित कालवड जोपासना तसेच दुभत्या जनावरांना हिरवे वैरण उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना अनुदानावर वैरण बियाणे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.वैरणासाठी १०० टक्के जाणार दिले जाणार आहे. यासाठी ३० लाखाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच अधिक दूध देणाऱ्या प्रजातीच्या गाईंची संख्या वाढावी यासाठी संकरित कालवडीच्या खाद्यासाठी १२ लाखाचे अनुदान दिले जाणार आहे. सेस फंडात यासाठी तरतूद केल्याची माहिती समितीच्या सभापती आशा गायकवाड यांनी दिली. तसेच दुधाळ जनावरांचे गट वाटप व शेळी गट वाटपासाठी प्रत्येकी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. या योजना ७५ टक्के अनुदानावर राबविल्या जाणार आहे. पशुखाद्य वाटपाची १०० टक्के अनुदानावर योजना राबविली जात आहे. यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रमांतर्गत संकरित कालवडी व म्हशीच्या पारड्याची जोपासना करण्यासाठी बिगर आदिवासी योजनेंतर्गत १० लाखाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. बैठकीला सदस्य सुरेंद्र शेंडे, गोपाल खंडाते, सुधाकर ढोणे, सुनील जामगडे, शालू हटवार व पशुधन विकास अधिकारी दीपक कडू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चौकट....तीन कोटींच्या योजनांना मंजुरीपशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या तीन कोटींच्या खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात पशुधन उत्पादन, विशेष घटक योजना, बिगर आदिवासी योजना, जनजाती क्षेत्राबाहेरील योजनांचा समावेश असल्याची माहिती कडू यांनी दिली.चौकट...दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी ६० लाखजिल्ह्यातील पाचगाव, सिर्सी व बेला येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुुरुस्तीसाठी ६० लाखाची तरतूद करण्यात आली. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सुविधा होईल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.