ठराव प्रकरणात आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज वाद : उपमहापौरांनी मागितली बाजू मांडण्यासाठी मुदत
By admin | Updated: December 23, 2015 00:17 IST
जळगाव : मनपा आयुक्तांकडून ठरावाची अंमलबजावणी होत नसल्यासंदर्भात उपमहापौरांनी दाखल केलेल्या दाव्यात मंगळवारी कामकाज झाले. त्यात आयुक्तांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून उत्तर दाखल करण्यासाठी उपमहापौरांच्यावतीने मुदत मागण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे.
ठराव प्रकरणात आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज वाद : उपमहापौरांनी मागितली बाजू मांडण्यासाठी मुदत
जळगाव : मनपा आयुक्तांकडून ठरावाची अंमलबजावणी होत नसल्यासंदर्भात उपमहापौरांनी दाखल केलेल्या दाव्यात मंगळवारी कामकाज झाले. त्यात आयुक्तांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून उत्तर दाखल करण्यासाठी उपमहापौरांच्यावतीने मुदत मागण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे.ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करीत उपमहापौरांनी मनपा आयुक्तांविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यासोबत ५० ठरावांची यादीही दिली आहे. त्यात द्विसदस्यीय खंडपीठाने आयुक्तांना याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी हे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्याची प्रत शनिवारी वादी यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी त्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली आहे. -------३ फेब्रुवारी रोजी कामकाजयाप्रकरणी न्यायालयाने आता ३ फेब्रुवारीची तारीख दिली आहे.