शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी नेतृत्वाचा पूर्णपणे लाभ

By admin | Updated: September 9, 2015 03:57 IST

अनुभवाच्या आधारे सोनिया गांधी आणि युवा शक्तीच्या आधारे राहुल गांधी यांच्या दुहेरी नेतृत्वाचा काँग्रेस पूर्णपणे लाभ घेत आहे. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद कधी सोपवायचे,

नवी दिल्ली : अनुभवाच्या आधारे सोनिया गांधी आणि युवा शक्तीच्या आधारे राहुल गांधी यांच्या दुहेरी नेतृत्वाचा काँग्रेस पूर्णपणे लाभ घेत आहे. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद कधी सोपवायचे, याबाबत पक्ष आवश्यकता भासेल तेव्हा निर्णय घेईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कार्यकारिणी बैठकीची माहिती देताना स्पष्ट केले. काँग्रेसमधील ज्येष्ठ दिग्गज नेत्यांना राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारणे अडचणीचे ठरले असते. त्यांनी वेळोवेळी त्याबाबत विरोधाचा सूर उठविला होता. सोनिया आणि राहुल गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी या मुद्यावर विस्तृत चर्चा करीत निर्णय घेतला. उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी विविध आंदोलनात पक्षाचा चेहरा म्हणून समोर येतील. पक्षात आणि बाहेर स्वीकारार्ह चेहरा म्हणून त्यांचा दावा मजबूत व्हावा, हा त्यामागचा उद्देश असेल. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कार्यकारिणीसंबंधी सर्व महत्त्वपूर्ण मुद्यांवर निर्णयाचा अधिकार राहील, असे सोनिया गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, आर.के. धवन, पी. चिदंबरम यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी झाले. या बैठकीत देशाची आर्थिक स्थिती आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. भूसंपादन विधेयकावर २० सप्टेंबर रोजी दिल्लीत एक रॅली आयोजित करण्याचा निर्णयही यावेळी झाला. तत्पूर्वी, राहुल गांधी बिहारचा दौरा करणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटून प्रचाराला वेग देतील. कार्यकाळ पाचऐवजी तीन वर्षांचासर्वाधिक काळ पक्षाध्यक्षपद सांभाळण्याचा विक्रम यापूर्वीच सोनिया गांधी यांच्या नावे जमा झाला आहे. त्यांनी १९९८ च्या प्रारंभी पक्षनेतृत्वाची धुरा स्वीकारली होती. डिसेंबर २०१० मध्ये बुरारी येथील अधिवेशनात पक्षाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात आला होता. आता काँग्रेसने पक्षघटनेत बदल प्रस्तावित करताना यापुढे सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा केला असून, संघटनात्मक निवडणुका पार पाडणे बंधनकारक राहील. काँग्रेस कार्यकारिणीने मंगळवारी पारित केलेल्या ठरावाला महाअधिवेशनात मान्यता दिल्यानंतर पक्षघटनेत बदल केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी एकच सदस्यत्व योजना आणली जाणार आहे. युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल किंवा महिला काँग्रेस या आघाड्यांमध्ये प्रवेश घेताच तो अ.भा. काँग्रेसमध्ये प्रवेश मानला जाईल. किमान २५ सदस्य जोडणाऱ्या कार्यकर्त्याला सक्रिय सदस्य मानले जाईल. अंतर्गत निवडणुकीत त्यांच्या शब्दाला किंमत असेल.