शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना वकिलांचा पाठिंबा

By admin | Updated: July 13, 2015 16:08 IST

पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेल्या गजेंद्र चौहानच्या नियुक्तीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून योग्य तो तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत यासंदर्भात न्यायालयात दाद मागायची असल्यास त्यांना कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन करण्यात येईल, असे अँड. असीम सरोदे यांनी सांगितले.

पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेल्या गजेंद्र चौहानच्या नियुक्तीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून योग्य तो तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत यासंदर्भात न्यायालयात दाद मागायची असल्यास त्यांना कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन करण्यात येईल, असे अँड. असीम सरोदे यांनी सांगितले.
चौहान यांच्यासह नियामक मंडळाच्या इतर सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महिन्यांपासून आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे, त्यांच्या या आंदोलनाला सामाजिक, कला, चित्रपट क्षेत्रासह अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे, त्यामध्ये आता कायदेतज्ञांचीही भर पडली आहे. यासंदर्भात सांगताना अँड. सरोदे म्हणाले, विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असलेले हे आंदोलन शिक्षणाचे महत्व टिकविण्यासाठी नव्हेतर शैक्षणिक प्रक्रियेतून होणा-या नेमणूक या कशा अपारदर्शक आणि अधोगामी विचारांचे स्वरूप पुढे आणत आहेत. विद्यार्थ्यांनी कुणाकडून शिक्षण घ्यायचे आणि शिकवणा-यांच्या दर्जाबाबत बोलायचे की नाही या प्रश्नांचा थेट संबंध निवड प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या निर्णयाला समावेश करून घेण्याशी आहे. जुन्या बुरसटलेल्या प्रक्रियांना नाकारण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना न्यायालयात जायचे असेल तर त्यांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रताप विटणकर, अलका बबलाद्री, राधिका देशपांडे, आस्था गुप्ता आदी वकिलांसह सामाजिक न्याय कार्यकर्ते संदीप बर्वे, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी तुषार वायळ, मुक्ता साठे तसेच जर्मनी येथील लॉ. स्टुडंट जुडीथ ओहन, एलीसा स्टर्न आदी उपस्थित होते. वकिलांच्या पाठिंब्याचे पत्र एफटीआयआय विद्यार्थी आंदोलनाचे समन्वयक अमेय गोरे यांना देण्यात आले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------