शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शनी पेठ पोलीस स्टेशनसमोर दोन गटात दगडफेक मध्ये तरुणावर हल्ला

By admin | Updated: February 22, 2016 00:27 IST

जळगाव: जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन रणजित अनिल चव्हाण (रा.गुरुनानक नगर) या तरुणावर हल्ला केल्याने शनी पेठमध्ये रविवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आला. यात पोलीस स्टेशनच्या समोरच दोन गटांनी एकमेकावर तुंबळ दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी संशयावरुन वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या परिसरात तणाव कायम होता.

जळगाव: जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन रणजित अनिल चव्हाण (रा.गुरुनानक नगर) या तरुणावर हल्ला केल्याने शनी पेठमध्ये रविवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आला. यात पोलीस स्टेशनच्या समोरच दोन गटांनी एकमेकावर तुंबळ दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी संशयावरुन वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या परिसरात तणाव कायम होता.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री साडे आठ वाजता रणजित चव्हाण हा तरुण शनी पेठ पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर मित्रांसोबत उभा असताना तेथे दहा ते बारा जणांनी येवून त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात जबर मार लागल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याचा रुग्णालयात जबाब घेवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करताच दोन्ही कडील लोक पोलीस स्टेशनला जमले व बाहेर शिवीगाळ करायला सुरुवात केली.
लाईट फोडून केला दगडाचा मारा
रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनच्या बाहेरच गर्दी जमा झाल्याने त्यातील काही जणांनी हल्ला करण्याच्या उद्देशाने परिसरातील पोलवर दगड मारुन लाईट फोडले. पोलीस स्टेशनलाच लागून असलेल्या विद्युत डी.पी.वरही दगडफेक करुन वीज पुरवठा बंद करण्यात आला.त्यानंतर दगड व विटांचा मारा सुरु झाला. यात काचेच्या बाटल्या तसेच ट्युब लाईटचा वापर करण्यात आला. याप्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांची धरपकड
दोन्ही बाजूंनी दीडशे ते दोनशे जणांचा जमाव एकमेकावर हल्ला करत असल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली.अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व नियंत्रण कक्षातून तातडीने जास्तीचा बंदोबस्त मागवून घेतला. यावेळी हल्लेखोरांना घरातून काढून ताब्यात घेण्याचे आदेश ठाकूर यांनी दिल्याने पोलिसांनी धरपकड सुरु केली. यात रात्री उशिरापर्यंत वीस जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
यांना घेतले ताब्यात
धरपकडमध्ये संशयावरुन हेमंत गोयल, लखन, अल्फाईज, अमिन, आकाश,अनीस शेख, जाकीर, मोहम्मद खाटीक व आसीफ शहा यांच्यासह वीस जणांना ताब्यात घेण्यात आले होते. नंदकुमार ठाकूर हे स्वत: रात्री त्यांची उशिरापर्यंत चौकशी करत होते.