शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तच्या घरासमोर जळगावच्या चोरट्यांची पाकीटमारी

By admin | Updated: February 28, 2016 22:31 IST

जळगाव: पुण्याच्या येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या संजय दत्तला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे पाकीट चोरणार्‍यांमध्ये जळगावच्या तीन चोरट्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. धरणगावच्या एकाला लागलीच ताब्यात घेण्यात आले होते,तर त्याने जळगावच्या आणखी दोन जणांची नावे सांगितली आहेत.त्यांच्या शोधासाठी मुंबई पोलीस जळगावा दाखल झाले आहेत.त्यांनी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसरा एक जण फरार आहे.

जळगाव: पुण्याच्या येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या संजय दत्तला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे पाकीट चोरणार्‍यांमध्ये जळगावच्या तीन चोरट्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. धरणगावच्या एकाला लागलीच ताब्यात घेण्यात आले होते,तर त्याने जळगावच्या आणखी दोन जणांची नावे सांगितली आहेत.त्यांच्या शोधासाठी मुंबई पोलीस जळगावा दाखल झाले आहेत.त्यांनी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसरा एक जण फरार आहे.
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल गुन्‘ात शिक्षा भोगून २५ फेब्रुवारी रोजी संजय दत्त पुण्याच्या येरवडा कारागृहातून बाहेर पडला होता. मुंबईत पोहचल्यानंतर त्याच्या पालीहील भागातील निवासस्थानासमोर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत बबन जगन सोनवणे (मुळ रा.धरणगाव ह.मु.उधना, सुरत) याला पाकीट मारतांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याच्यावर खार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगावच्या दोघांची नावे
खार पोलिसात अटकेत असलेल्या खलसे याच्या चौकशी केली असता त्याने आपल्यासोबत या कामात जळगावचा विशाल भाऊसाहेब मोरे (वय १९ रा.गेंदालाल मील, जळगाव) व आणखी एक जण असल्याचे सांगितले. त्यावरुन खार पोलिसांनी जळगाव शहरचे सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांच्याशी संपर्क साधून संशयितांची नावे सांगितले. या दोघांना घेण्यासाठी दोन कर्मचारी शनिवारी रात्री जळगावात दाखल झाले होते.
रेल्वे स्टेशनवरुनच घेतले एकाला ताब्यात
मुंबई पोलिसांनी सांगितल्यानुसार गंधाले यांनी गुन्हे शोध पथकाचे इम्रान सैय्यद, गणेश शिरसाळे, अकरम शेख, सुधीर सावळे व संजय भालेराव आदींना दोघांचा शोध घेण्यासाठी पाठविले असता त्याच वेळी रेल्वे स्टेशनवरील डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाद सुरु होता. यावेळी पळापळ होत असताना विशाल हा पोलिसांच्या हाती लागला.
फोटोवरुन केली खात्री
शहर पोलिसांनी विशालला ताब्यात घेतल्यानंतर खार पोलिसांनी त्याचा फोटो काढून व्हॉटस्ॲपवर त्या पोलीस स्टेशनला पाठविला. त्यांच्या ताब्यात असलेल्या बबनला हा फोटो दाखविला असता त्याने विशालला ओळखले. त्याचा दुसरा साथीदार मात्र मिळून आला नाही.रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता. तर विशालला घेवून खार पोलीस रात्रीच रवाना झाले.