शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरीफांसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला सुनावले खडे बोल

By admin | Updated: May 22, 2017 16:14 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दहशतवादाचा बळी असल्याचं म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमतसौदी अरेबिया, दि. 22 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दहशतवादाचा बळी असल्याचं म्हटलं आहे. रियादमध्ये इस्लामिक देशांच्या नेत्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ट्रम्प यांनी इतर देशांना दहशतवादाविरोधात लढण्याचं आव्हान केलं आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र दौ-यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 इस्लामिक देशांच्या नेत्यांना संबोधित केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणात मुस्लिम देशांच्या नेत्यांना दहशतवादाचा खात्मा करण्याचं आवाहन केलं आहे. या पवित्र धरतीवर दहशतवादाला थारा देऊ नका. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफही उपस्थित होते. ट्रम्प म्हणाले, दहशतवाद जगामध्ये पसरतोय. दहशतवादाचे जगभरातील जवळपास सर्वच देश बळी आहेत. काही देश दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेपासून भारत आणि रशियासारखे देशही प्रभावित होत आहेत. ट्रम्प म्हणाले, धर्माच्या नावाखाली चाललेला दहशतवादाचा खेळ आता बंद झाला पाहिजे. सौदी अरेबियासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर काहीसा बदलल्याचं नजरेस आलं आहे. ट्रम हे दहशतवादाला उद्देशून संपूर्ण इस्लामिक दहशतवाद असा शब्द नेहमीच वापरत आले होते. दहशतवादाच्या मुद्द्यावर पश्चिम आणि इस्लाममध्ये कोणतीच लढाई नाही. खरं तर ही  चांगले आणि वाईट यातील लढाई आहे, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेचा उद्देश हा दहशतावादाच खात्मा करण्याचा आहे. इथे आम्ही भाषण देण्यासाठी नव्हे, तर चांगलं भविष्य घडवण्यासाठी आम्ही आलो आहोत, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.