गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
कर्जत : नांदगाव येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह दोन तास कर्जत पोलीस स्टेशनपुढे ठेवला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.
गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर
कर्जत : नांदगाव येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह दोन तास कर्जत पोलीस स्टेशनपुढे ठेवला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हरिश्चंद्र बागल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शारदा बागल ही घरी एकटी होती हे पाहून अशोक गायकवाड याने शारदा बागलबरोबर बळजबरी केली, हे करत असताना सुरेखा बागल हिने पाहिले व तिला दम दिला. शारदा बागल हिस घरामागे बोलावून घेतले व तिला कुकडीच्या कॅनॉलमध्ये ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने ती मयत झाली. तिचा मृतदेह (१३) काल देशमुखवाडी शिवारात आढळला. मात्र आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. आज दोन तास कर्जत पोलीस स्टेशनपुढे विवाहितेचा मृतदेह ठेवण्यात आला. अशोक गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यावेळी नातेवाईकांसह सचिन पोटरे, बापूराव नेटके, आंबादास पिसाळ, माऊली मांडगे आदी उपस्थित होते. विवाहितेच्या खून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एन. ससाणे हे करत आहेत.