शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मित्रामुळे HIV झाल्याने 'त्या'ने केली मित्राच्या आईची हत्या

By admin | Updated: July 11, 2015 07:00 IST

मित्रामुळे एचआयव्हीची लागण झाल्याने दिल्लीत एका वाहनचालकाने वचपा काढण्यासाठी मित्राच्या आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ११ - मित्रामुळे एचआयव्हीची लागण झाल्याने दिल्लीत एका वाहनचालकाने वचपा काढण्यासाठी मित्राच्या आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तब्बल चार महिन्यांनी या हत्येची गुंता उलगडला असून पोलिसांनी मारेकरी वाहनचालकाला अटक केली आहे. 
दिल्लीतील रोहिणी येथे २१ एप्रिल रोजी एका महिलेची निर्घृणपणे हत्या झाली होती. या हत्येमागे श्याम नामक वाहनचालकाचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र श्याम पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. अखेरीस काही दिवसांपूर्वी श्यामला बिहारमधील मूळगावातून अटक करण्यात आली. श्यामला पोलिसांनी दिल्लीत आणून कसून चौकशी केली असता या हत्येचा खुलासा झाला व पोलिसही चक्रावून गेले. श्याम व अनिल हे दोघेही वाहनचालक असून दोघेही मुळचे बिहारचे होते. श्याम काही महिन्यांपूर्वी किडनीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेला असता त्याला एचआयव्ही झाल्याचे समजले. श्याम हा वारांगनेकडे गेला होता व तिच्याकडूनच त्याला एचआयव्हीची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. अनिलने त्याच्या मित्रमंडळींमध्ये श्यामला एचआयव्ही झाल्याची माहिती पसरवली व मीच त्याला जाणूनबुजून एचआयव्हीबाधीत वारांगनेकडे पाठवल्याचे अनिलने सर्वांना सांगितले होते. ही माहिती श्यामला समजली व त्याने अनिलला धडा शिकवण्याचा निर्धार केला. काही दिवसांनी अनिल त्याच्या गावी गेला असता श्यामने अनिलच्या आईची हत्या केली. श्यामची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.