शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तिबेटची गरज

By admin | Updated: July 6, 2015 23:51 IST

फोटो ओळ..

फोटो ओळ..
दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त तिबेटच्या आंदोलनावर आयोजित चर्चासत्रात सहभागी प्रभाकर कोंडबत्तुनवार, ॲड. विमलसूर्य चिमणकर आणि अशोक बोंदाडे.
भारताच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तिबेटची गरज
समता सैनिक दल : विमलसूर्य चिमणकर यांचे प्रतिपादन
नागपूर : चीनचे विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता भारताच्या सुरक्षेसाठी तिबेट हा स्वतंत्र देश असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक ॲड. विमलसूर्य चिमणकर यांनी केले.
दलाई लामा यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त हिंदी मोरभवन येथे समता सैनिक दलातर्फे तिबेटच्या मुक्ती आंदोलनावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तुनवार, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे व्यासपीठावर होते.
ॲड. चिमणकर म्हणाले, तिबेट हे एक प्राचीन बौद्ध राष्ट्र आहे. आज ते चीनच्या ताब्यात आहे. त्याच्या स्वातंत्र्यासाठी दलाई लामा यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. आजही हा संघर्ष सुरू आहे. भारत हा नेहमीच तिबेटच्या बाजूने राहिला आहे. परंतु सध्या केंद्र सरकारचे धोरण मात्र कमालीचे दुटप्पीचे असल्याचे दिसून येत आहे. तिबेटची सुरक्षा ही भारतासाठी किती आवश्यक आहे, हे एकूणच भौगोलिक परिस्थितीवरून दिसून येते. अशा वेळी भारताने तिबेटचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. इतकेच नव्हे तर ज्या चीनने भारताला नेहमी धोका दिला आहे. देशावर आक्रमण केले. असे असतांनाही चीनसोबत संबंध वाढविण्यावर भर दिला जात आहे. हे एकूणच चुकीचे आहे.
प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनीसुद्धा भारताच्या विदेश धोरणावर प्रहार केला. भारताची विदेश नीती ही अतिशय कमकुवत आहे. तिबेटच्या मुद्यावर भारत लाचारीने वागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक बोंदाडे यांनी तिबेटमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर प्रकाश टाकला. भारताने आपल्या सुरक्षेसाठी तिबेटला मदत करणे गरजेचे आहेच. परंतु जगानेसुद्धा मानवतावादी दृष्टिकोनातून तिबेटला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक सुनील सारीपुत्त यांनी संचालन केले. विदर्भ संघटक राहुल वासनिक यांनी आभार मानले.