शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एक मुश्त सफाई ठेक्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 22, 2015 00:39 IST

जळगाव : शहरात स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडालेला असताना शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी दिशाहीन प्रशासनावर ताशेरे ओढले होते. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने एक मुश्त सफाईचा ठेक्याला मंजुरी दिली असून सोमवारपासून शहरात स्वच्छतेला सुरुवात होणार आहे. स्वच्छतेचा ठेका बंद करण्यापूर्वी महापालिकेने कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या ...


जळगाव : शहरात स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडालेला असताना शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी दिशाहीन प्रशासनावर ताशेरे ओढले होते. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने एक मुश्त सफाईचा ठेक्याला मंजुरी दिली असून सोमवारपासून शहरात स्वच्छतेला सुरुवात होणार आहे.
स्वच्छतेचा ठेका बंद करण्यापूर्वी महापालिकेने कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या सभेत खान्देश विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी अधिकार्‍यांनी चांगलेच धारेवर धरले होते. स्वच्छता होत नसल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत. आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना या परिस्थितीचा विचार न करता मनपाने स्वच्छतेचा ठेका बंद केल्यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला.
८७१ कर्मचारी करणार स्वच्छता
शहरात स्वच्छता करण्यासाठी मक्केदार लहु रामा पर्वते यांनी मंजूर दरात काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार या मक्तेदाराकडे ३५० कर्मचारी असून महापालिकेच्या आस्थापनेवर ५२१ असे एकूण ८७१ कर्मचारी सोमवारपासून स्वच्छता करणार आहे.
दोन महिन्यात निविदा पूर्ण होणार
स्वच्छता करण्यासाठी महापालिकेतर्फे नव्याने ई-निविदा प्रक्रिया प्रभाग समिती निहाय काढण्यात येणार आहे. या निविदांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली होती. वास्तविक या निविदा प्रक्रियाला अजून दोन महिने लागणार असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
७ लाख रुपयांचा धनादेश मंजूर
महापालिकेच्या मालकीच्या वाहनांचे टायर, ट्यूब खराब झाले आहेत. त्यामुळे अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यापार्श्वभूमीवर नवीन टायर, ट्यूब खरेदीसाठी ७ लाख रुपयांचा धनादेश मंजुर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी दिली आहे. लवकरच बंद पडलेल्या वाहनांचे टायर व ट्यूब बदलवून बंद वाहने पूर्ववत सुरू केले जातील, अशी माहिती बरडे यांनी दिली.