शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

बनावट करारनाम्यावरून वाहन हडपण्याचा प्रयत्न

बनावट करारनाम्यावरून वाहन हडपण्याचा प्रयत्न
नागपूर : बनावट करारनामा तयार करून एका महिलेची बोलेरो जीप हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर जरीपटका पोलिसांनी गुन्हे दाखल केले. राजू सैनी (बाबा बुद्धाजीनगर) आणि फिरोज खान (टेकानाका) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी राजू सैनी याने शिरीन सुलताना अब्दुल खलील (वय ५५, रा. कामगार नगर, नारी रोड) यांच्या मालकीची बोलेरो (एमएच ४० / वाय ९३६०) विकत घेण्याचा करार केला. त्यानंतर फायनान्सरकडे रक्कम जमा न करताच बनावट कागदपत्रे तयार करून ही बोलेरो फिरोज खानच्या ताब्यात दिली. २ ऑगस्ट २०१४ पासूनची ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर शनिवारी दुपारी शिरीन यांनी जरीपटका पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरुन जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
-----
भूखंडाची बनावट कागदपत्रे बनविली
नागपूर : मानेवाड्यातील रुपाली प्रवीण कळंबे (वय ३०) यांच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या सात आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. काशीनाथ तुकाराम सोनवणे , राधिकाताई काशीनाथ सोनवणे, रोशन लहानुजी बाळसराफ, सचिन लहानुजी बाळसराफ, तेजराम छोटेलाल पारधी, गेडाम टेलर आणि नितीन शितलप्रसाद चौबे अशी आरोपींची नावे आहेत. १३ एप्रिल ते ११ जुलै या कालावधीत उपरोक्त आरोपींनी रुपाली प्रवीण कळंबे यांच्या जरीपटका हद्यीतील मौजा नारी, पहन ११, खसरा नं. १२६ ची बनावट कागदपत्रे तयार केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कळंबे यांनी शनिवारी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
---