शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

फॅब इंडियाकडून खादीच्या नावाखाली ग्राहकांची लुबाडणूक

By admin | Updated: February 13, 2017 15:43 IST

खादीच्या नावाखाली सुती कपड्यांची विक्री केल्याप्रकरणी फॅब इंडियाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - खादीच्या नावाखाली सुती कपड्यांची विक्री केल्याप्रकरणी फॅब इंडियाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फॅब इंडिया खादीच्या नावाखाली सुती कपड्यांची विक्री करत असून, ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आलं आहे. त्यामुळे खादी, ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) फॅब इंडियाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला 15 दिवसांत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. फॅब इंडियाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कडक कारवाईचा इशारा खादी व ग्रामोद्योग आयोगानं दिला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोग हे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या सगळ्यावर प्रकारावर आयोगाच्या अध्यक्षांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना म्हणाले, प्रतिष्ठा जपण्याच्या बाबतीत आम्ही आग्रही आहोत. या सगळ्या प्रकारामुळे ग्रामीण कारागिरांच्या हिताला बाधा पोहोचवून फायदा मिळवण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा कायद्यांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. भारतातील खादीचा व्यापार आणि खादी उत्पादनांच्या विक्रीसाठी खादी चिन्ह नियमन कायदा २००३ आणि खादी, ग्रामोद्योग आयोगाच्या कायद्यांतर्गत काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार खादीच्या कोणत्याही उत्पादनाची खादी मार्क असल्याशिवाय विक्री करता येत नाही. खादीचे उत्तम कपडे मिळवण्यासाठी फॅब इंडिया प्रसिद्ध आहे. परंतु आता फॅब इंडियाला पाठवण्यात आलेल्या नोटिशीमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. फॅब इंडियाच्या दुकानांत मिळणाऱ्या कपड्यांवर फॅब इंडिया कॉटन असा टॅग असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्याची गंभीर दखल घेऊन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने फॅब इंडिया कंपनीचे सीईओ विनय सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.