शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बलांविषयी कणव ठरणार मूल्यमापनात जमेची बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 03:24 IST

सचिव आणि अतिरिक्त सचिव पदांवरील ज्येष्ठ ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यमापन करताना इतर गोष्टींखेरीज समाजातील दुर्बल घटकांविषयी त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हेही विचारात घेतले जावे

नवी दिल्ली: सचिव आणि अतिरिक्त सचिव पदांवरील ज्येष्ठ ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यमापन करताना इतर गोष्टींखेरीज समाजातील दुर्बल घटकांविषयी त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हेही विचारात घेतले जावे, असा सरकारचा प्रस्ताव आहे.भारतीय प्रशासकीयसेवेतील (आयएएस) अधिकाºयांसाठी सुधारित वार्षिक ‘अ‍ॅप्रेजल’ फॉर्मचे मसुदे केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने तयार केले असून ते मते जाणून घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहेत. राज्यांनी त्यावर त्यांचे अभिप्राय २८ जूनपर्यंत देणे अपेक्षित आहे. तोपर्यंत उत्तर न आल्यास संबंधित राज्याला ‘अ‍ॅप्रेजल’च्या या सुधारित पद्धतीस आक्षेप नाही, असे मानले जाईल, असे केंद्राने पाठविलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.या सुधारित ‘अ‍ॅप्रेसजल’ फॉर्मचे दोन नमुने तयार करण्यात आले आहेत. एक फॉर्म फक्त सचिव आणि अतिरिक्त सचिव किंवा समकक्ष पदांवरील अधिकाºयांसाठी आहे ,तर दुसरा त्याखेरीज इतर हुद्द्यांवरील अधिकाºयांसाठी आहे.सचिव व अतिरिक्त सचिव हुद्द्याच्या अधिकाºयांच्या कामाचे मूल्यमापन करताना समाजातील दुर्बल घटकांविषयी त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, याचीही नोंद घेतली जाणार आहे. याखेरीज या अधिकाºयांना, खास करून गुंतागुंतीच्या, संदिग्ध व आणिबाणीच्या स्थितीत वेळीच परिणामकारक निर्णय घेण्याची कितपत क्षमता आहे, याचाही तपशील द्यावा लागणार आहे.जे आपल्याला योग्य वाटते त्यावर ठाम राहून त्याची जबाबदारी स्वीकारणे, नाविन्यपूर्ण कल्पना, इतरांकडून सहकार्य व समन्वयाने काम करून घेण्याची क्षमता व सोपवलेले काम तडीस नेण्याची हातोटी यासारख्या प्रत्येक गुणविशेषावर या अधिकाºयांना प्रत्येकी ५० शब्दांपर्यंतचे स्वत:विषयीचे टिपणही लिहावे लागणार आहे.प्रस्तावित सुधारित पद्धतीनुसार सचिव आणि अतिरिक्त सचिव हुद्द्याच्या अधिकाºयांचे मूल्यमापन ‘नैतिक सचोटी’ व ‘वित्तीय सचोटी’ अशा दोन्ही निकषांवर केलेजाईल. मात्र इतर अधिकाºयांसाठी सर्वसाधारण सचोटी एवढाच निकष असेल.सर्वच अधिकाºयांना त्यांच्या मते त्यांचे विशेष प्राविण्याचे किमान चार कार्यविषय कोणते, याचीही नोंद करावी लागेल. यात सामाजिक विकास, देशांतर्गत घडामोडी व संरक्षण, उद्योग व व्यापार, सार्वजनिक वित्त व्यवस्था, नैसर्गिस साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, कार्मिक व्यवहार व सर्वसाधारण व्यवस्थापन, प्रशासकीय सुधारणा व विविध प्रकारच्या नियंत्रण व्यवस्था यांचा यात समावेश असेल.