शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अफवेखोर चार ॲडमिन, पाच सदस्यांवर कारवाई व्हॉट्स ॲपवर अफवा पसरविणार्‍यांना चपराक : सोशल मीडियाद्वारे गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचे केले मेसेज फॉरवर्ड; पंढरपूर

By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST

पंढरपूर :

पंढरपूर :
गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून गावची गावे वेठीस धरुन त्यांच्यात भय, भीती निर्माण करुन अफवा पसरविणार्‍या व्हॉट्स ॲप ग्रुपचे चार ॲडमिन तर पाच सदस्यांना पंढरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजता ताब्यात घेतले. या नऊ जणांना चांगलीच तंबी देऊन त्यांना सोडूनही देण्यात आले. चोर, दरोडेखोर घुसल्याच्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक अख्खी रात्र जागून काढत होते.
सोशल मीडियाद्वारे केवळ अफवा पसरविल्या जात आहेत, हे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी केलेल्या कारवाईवरून स्पष्टही झाले.
पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यात चोरट्यांच्या अफवा पसरवत काल्पनिक फोटोही अपलोड करून व्हायरल करण्याचे काम जोरात सुरू होते. यामुळे नागरिक प्रचंड तणावाखाली तर होतेच त्याबरोबरच आपल्या सुरक्षेसाठी मुलाबाळांसह अक्षरश: रात्र जागून काढत होते. दरम्यान पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना आदेश देऊन अफवा पसरविणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पंढरपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत असल्याने सोमवारी रात्री अशा अफवेखोर ॲडमिनच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यात विविध भागातील दहा जणांचा समावेश आहे. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखालील पो. हे. काँ. अनिल शिंदे, गणेश शिंदे, शरद कदम, सचिन लवटे, विजय देडे यांच्या पथकाने केली.
हे आहेत ग्रुप
पंढरपूर परिसरातील विठ्ठल मंदिर परिसर, फ्रेंडशिप फॉरेवर, छत्रपती, मैत्री या व्हॉट्स ग्रुपमधील प्रत्येकी एक ॲडमिन अशा चार तर ग्रुपमधील पाच सदस्य अशा नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
एक अफवेखोर केरळमध्ये
मैत्री ग्रुपद्वारे अफवा पसरविणारा सदस्य पंढरपुरातील असला तरी तो सध्या केरळमध्ये फिरायला गेला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
दिवसभर ५0 मोबाईलची तपासणी
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. दयानंद गावडे यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन नागरिकांना अफवा पसरवू नका, असे आवाहन करीत आहेत. सोमवारी सायंकाळी अनवली येथे याबाबत बैठक घेण्यात आली. दरम्यान एका तरूणाच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याच्याच मोबाईलवर तीन ग्रुप सापडले. त्याच आधारे तपास केला असता आणखी एक ग्रुप आढळला. दिवसभर ५0 मोबाईलची तपासणी करण्यात आली आहे.
कोट:::::::::::::::::
अफवा पसरवू नका, असे आवाहन करूनही व्हॉट्स ॲपद्वारे नागरिकांना भयभीत करण्यात येत होते. आज याबाबत चौकशी करून ९ जणांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.
-दयानंद गावडे,
पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे