शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, तीन जवान शहीद

By admin | Updated: May 21, 2017 19:41 IST

जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम विभागात लष्काराने सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले

ऑनलाइन लोकमच
 श्रीनगर, दि. 21 - जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम विभागात लष्काराने सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर या कारवाईत तीन जवानांना वीरमरण आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. 
 
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरातील नौगाम विभागात काल नियंत्रण रेषेवर मोठ्या शस्त्रसाठ्यासह सज्ज असलेला काही दहशतवाद्यांचा गट घुसखोरीच्या प्रयत्नात होता. लष्कराला याची माहिती मिळताच त्वरित कारवाई करून या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांकडून  लष्करावर गोळीबारास सुरुवात केली. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर दोन दहशतवाद्यांना कालच ठार करण्यात आले होते.दरम्यान, ही चकमक आजही सुरु होती. 
 
शुक्रवारी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला इशारा देताना नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास त्याचे चोख प्रत्युत्त देण्यात येईल, असे सांगितले होते. त्याला एक दिवस उलटत नाही तोच दहशतवाद्यांनी मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.