शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चार अतिरेक्यांना काश्मिरात कंठस्नान

By admin | Updated: February 13, 2017 04:17 IST

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पहाटे झडलेल्या भीषण चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात दोन जवान शहीद व एक नागरिक ठार

कुलगाम : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पहाटे झडलेल्या भीषण चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात दोन जवान शहीद व एक नागरिक ठार झाला. चकमकीचे राज्यात हिंसक पडसाद उमटल्यानंतर आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी लष्कराने केलेल्या गोळीबारात १ ठार, तर १५ जखमी झाले.कुलगाम जिल्ह्यातील नगबल गावात लष्कर-ए-तोएबा व हिज्बुल मुजाहिदीनचे अतिरेकी लपले असल्याची गुप्त खबर मिळाल्यानंतर लष्कराने कारवाई केली. सुरक्षा दलांचे हे मोठे यश आहे. ज्या घराच्या परिसरात चकमक सुरू होती; त्या घरमालकाचा मुलगा यात सापडला व दुर्दैवाने ठार झाला, असे पोलीस महासंचालक एस.पी. वैैद यांनी सांगितले.चकमकीत जखमी झालेल्या भारतीय लष्कराच्या ३ जवानांना विमानाने श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात हलविण्यात आले. (वृत्तसंस्था)

बनावट छताआड लपले होते अतिरेकीस्पेशल आॅपरेशन्स ग्रुपने अतिरेकी लपलेल्या गावाला रविवारी पहाटे  ३.३० वाजता घेरले. राष्ट्रीय रायफल्सचे विशेष पथकही दाखल झाले. सुरुवातीला हाती काही लागले नव्हते.  पुन्हा घरमालकाच्या मुलाच्या मदतीने शोधसत्र हाती घेण्यात आले. त्या वेळी घराचे छत बनावट असल्याचा संशय आल्यावरून ते काढण्यास सांगितले असता तेथे लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. यात लान्सनायक रघुबीरसिंग व लान्सनायक भंदोरिया गोपालसिंग शहीद झाले व घरमालकाचा मुलगा ठार झाला. तीन तास चाललेल्या या चकमकीत लष्कर-ए-तोएबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. हिंसक निदर्शनांमध्ये जमावाची दगडफेक व सुरक्षा दलांचा गोळीबार चकमकीचे वृत्त कळताच कुलगाम भागात हिंसक निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी लष्कर व सुरक्षा दलांवर तुफान दगडफेक केली. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलांनी गोळीबार केला. यात १५ जण जखमी झाले. त्यापैैकी एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.