शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जवानाच्या गोळीबारात चार जवान जागीच ठार

By admin | Updated: January 13, 2017 01:05 IST

बिहारमधील एका औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने आपल्या

एस. पी. सिन्हा / पाटणाबिहारमधील एका औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक गोळीबार  केल्याने एकच खळबळ माजली. चारपैकी दोघे जवान जागीच ठार झाले, तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रकार घडला. मृतांत एक सहायक फौजदार आणि तीन हवालदारांचा समावेश आहे. बलवीरसिंग असे आरोपी जवानाचे नाव असून, तो उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील रहिवासी आहे. नवीननगर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडच्या येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात आहेत. रजेच्या मुद्द्यावरून सहकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर, बलवीरसिंग याचा स्वत:वरील ताबा सुटला आणि त्याने सहकाऱ्यांवर गोळीबार केला, असे पोलीस अधीक्षक डॉ. सत्यप्रकाश यांनी सांगितले. बलवीर याला अटक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. बलवीरने सर्व्हिस रायफलमधून सहकाऱ्यांवर गोळ््या झाडल्या. त्यात दोन जण जागीच ठार झाले, तर दोघांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे ते मरण पावले. रात्री साडेबारा वाजता एका गटाची पाळी संपून दुसऱ्या गटाची पाळी सुरू होत असताना ही घटना घडली. बलबीरने चौघांवर गोळ््या झाडल्यानंतर उर्वरित सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. बरवीरसिंग दोन महिन्यांच्या योग प्रशिक्षणानंतर नुकताच कामावर परतला होता. त्याच्या रजेबाबत काही तक्रारी होत्या, असे सांगण्यात आले.  घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कोर्ट आॅफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.