शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताने चार वयोवृद्ध प्रवाशांचा रेल्वेमध्येच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 08:26 IST

केरळ एक्स्प्रेसमधील चार वयोवृद्ध प्रवासी उत्तर प्रदेशमधील कडक उन्हाळा सहन न झाल्याने मृत्युमुखी पडले.

झाशी : केरळ एक्स्प्रेसमधील चार वयोवृद्ध प्रवासी उत्तर प्रदेशमधील कडक उन्हाळा सहन न झाल्याने मृत्युमुखी पडले. त्यातील तीन जणांना रेल्वेगाडीतच मृत्यूने गाठले, तर चौथा प्रवासी झाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी दगावला. मृतांमध्ये बालकृष्ण रामस्वामी (७० वर्षे), पी. कमला (७६), सुब्बरय्या (८०), धीवा नई यांचा समावेश आहे. हे कोइम्बतूरचे रहिवासी असून, आग्रा येथून ते रेल्वेने आपल्या घरी परतत होते. शवचिकित्सेनंतर या चौघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले.रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोइम्बतूरहून ६७ पर्यटकांचा एक गट एस-आठ, एस-नऊ या डब्यांतून प्रवास करीत होता. त्यामध्ये हे चार जण होते. ग्वाल्हेरनजीक केरळ एक्स्प्रेस आली असताना या चौघांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यानंतर ते रेल्वेतच बेशुद्ध पडले. ही घटना तिकीट तपासनीसाने झाशी नियंत्रण कक्षाला तात्काळ कळवून वैद्यकीय मदत मागवली. झाशी येथे डॉक्टरांनी या चार प्रवाशांची रेल्वेतच तपासणी केली आणि त्यातील तीन जण मरण पावल्याचे जाहीर केले. एका प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले होते. कडक उन्हाळा सहन न झाल्याने केरळ एक्स्प्रेसमधील चार प्रवासी मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शवचिकित्सेच्या अहवालानंतरच नेमके कारण कळू शकेल, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. चार प्रवासी बेशुद्ध पडल्याचे समजताच तिथे सर्वप्रथम धाव घेणाऱ्यांमध्ये झाशीचे पोलीस उपनिरीक्षक विनय साहू होते. ते म्हणाले की, आग्रा येथून रेल्वेने प्रस्थान करताच वयोवृद्ध प्रवाशांना उन्ह सहन न झाल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबरोबर त्यांचे नातेवाईकही केरळ एक्स्प्रेसने प्रवास करीत होते.