शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 13, 2017 19:11 IST

गटासाठी १५ जणांची, तर गणांसाठी २५ उमेदवारांची माघार

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या सोमवारी (दि.१३) या दिवशी नाशिक तालुक्यातील चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली.माघारीच्या अंतिम दिवशी गटांसाठी १५, तर गणांसाठी २५ उमेदवारांनी माघारी घेतल्या. माघारी घेतलेल्या उमेदवारांमध्ये गिरणारे गटातून संगीता चारस्कर व इंदूबाई बेंडकोळी, पळसे गटातून उपसभापती अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, सविता तुंगार, हरिश्चंद्र बोराडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी माघारी घेतल्या. तर एकलहरे गटासाठी प्रकाश आडके, अतुल धनवटे, मोहन लिंबोळे, तसेच गोवर्धन गटातून वामन हिरामण खोसकर, राहुल गुंबाडे, राजेंद्र चारस्कर, रवींद्र मोंढे, कृष्णा वाघ यांचा अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांमध्ये समावेश आहे. पंचायत समितीच्या आठ गणांसाठी देवरगाव गणातून लताबाई उदार, गिरणारे गणातून दीपाली कडाळे, संगीता चारस्कर, सिद्धप्रिंपी गणातून सोनाली कांडेकर, रेखा ढिकले, संगीता ढिकले, सुनंदा पेखळे, पळसे गणातून राणी गायधनी, लीलाबाई गायधनी, सविता तुंगार, प्रियंका धात्रक, एकलहरे गणातून शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, सुरेश घुगे, भाऊसाहेब जगताप, लक्ष्मण ढोमसे, राजू धात्रक, सुनंदा पेखळे, प्रकाश बर्वे, मोहन लिंबोळे, लहवित गणातून मंगला गोडसे, गोवर्धन गणातून तानाजी गडदे, विल्होळी गणातून संपत चुंबळे, भास्कर थोरात, सदानंद नवले आदिंनी माघारी घेतल्या आहेत. सोमवारी सकाळपासूनच शिवसेनेकडून तालुकाप्रमुखांसह बंडखोरांचे मन वळविण्यासाठी फारसे प्रयत्न केले गेले नसल्याचे चित्र होते.