पान-4, काणकोण येथील अपघातात चौघे जखमी
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
काणकोण : काणकोण येथील कदंब बसस्थानकासमोरील महामार्गावर झालेल्या मोटरसायकल व स्कुटर अपघातात चौघे युवक जखमी झाले. ही घटना रविवार (दि. 2) रोजी सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास घडली.
पान-4, काणकोण येथील अपघातात चौघे जखमी
काणकोण : काणकोण येथील कदंब बसस्थानकासमोरील महामार्गावर झालेल्या मोटरसायकल व स्कुटर अपघातात चौघे युवक जखमी झाले. ही घटना रविवार (दि. 2) रोजी सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरपिर्ला येथील सुभाष गावकर व रोहिदास गावकर हे (जीए. 09 जे. 6462) क्रमांकाची मोटरसायकल घेऊन कदंब बसस्थानकावरून महामार्गावर येत होते. तर रफीक व अर्शफ हे मामा-भाचे (जीए. 10 बि. 3965) क्रमांकाची ज्युपीटर स्कुटर घेऊन चार रस्त्यावरून चावडी येथे जात होते. तेव्हा दोन्ही दुचाकींत समोरासमोर टक्कर झाली. अपघातात रफीक यांच्या तोंडाला जबर मार बसला. त्यानंतर चौघांना काणकोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. (लो. प्र)