चार थोडक्यात बातम्या....
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
मोबाईल चोर गजाआड
चार थोडक्यात बातम्या....
मोबाईल चोर गजाआड मुंबई: गर्दीची ठिकाणे, बस, टॅक्सी, रिक्षा तसेच एकट्या नागरिकांकडील मोबाईल, पाकिट चोरी करणार्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. इजाज शेख (३८) असे आरोपीचे नाव असून तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. शेख अभिलेखावरील आरोपी असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली...................गुन्हा दाखल करण्यावरुन वादमुंबई: भांडुपचा रहिवासी असलेला शरीफ खान (३६) याचा मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. मात्र खानच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्याची नोंद करण्यावरुन मुलुंड आणि भांडुप पोलीस ठाण्यात हद्दीचा वाद सुरु होता. अखेर मुलुंड पोलिसांनीच पुढाकार घेऊन घटनेची नोंद करुन अधिक तपास सुरु केला...................जखमी तरुणाचा रुग्णालयात धिंगाणामुंबई: बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांच्या मारहाणीत जखमी झालेल्या अजय जगदाळे या तरुणाला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. जगदाळेकडे अधिक विचारणा करत असताना त्याने डॉक्टर आणि पोलिसांशी हुज्जत घालून दमदाटी करण्यास सुरुवात केली. पहाटे चार वाजल्यापर्यंत जगदाळेचा धिंगाणा सुरु होता. अखेर पोलिसांनी जगदाळेविरोधातच गुन्हा दाखल केला..................टॅक्सीचालकाकडून पैसे उकळणारा गजाआड मुंबई: टॅक्सीचालकाला आरटीओ विभागाकडून टॅक्सी पासिंगचे काम करुन देण्याच्या नावाखाली ५०० रुपयांची मागणी करणार्यावर ॲन्टी करप्शन ब्युरोने गुरुवारी कारवाई केली. दिलीप दिनकर घाडगे (३७) असे आरोपी इसमाचे नाव असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे..................