जबरी लूट प्रकरणी सिद्धार्थनगरमधील चौघांना अटक
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
नाशिक : नादुरु स्त वाहनाजवळ उभ्या असलेल्या दोघांना बेदम मारहाण करून लुटणार्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली असून पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़ सिद्धार्थनगर परिसरात ३० जून २०१५ रोजी वाहन नादुरुस्त झाल्याने ते दुरुस्त करण्याचे काम दोघे जण करीत होते़ यावेळी तिथे आलेले संशयित सुनील ऊर्फ गुूर नागू गायकवाड, पिंटू नागू गायकवाड, दीपक मधुकर गुंजाळ व त्यांच्यासह एकाने त्या दोघांना बेदम मारहाण करून लूट केली होती़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. तर उर्वरित एका संशयितास बुधवारी (दि.८) अटक केली. या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून यातील सुनील गायकवाडवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)