शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगन दोषी

By admin | Updated: February 25, 2016 03:20 IST

भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेले माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगन यांना १९९३-९४ मध्ये सरकारी दुकानांच्या वितरणातील घोटाळ्याबद्दल दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

नवी दिल्ली : भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेले माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगन यांना १९९३-९४ मध्ये सरकारी दुकानांच्या वितरणातील घोटाळ्याबद्दल दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या घोटाळ्यातील दोघा जणांना सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव आगरवाल यांनी निर्दोष ठरवले आहे.केंद्रीय नगरविकास आणि रोजगारमंत्री शीला कौल आणि आणखी एक आरोपी तुलसी बालोडी यांचे खटल्याची सुनावणी सुरू असताना निधन झाल्याने त्यांच्यावरील आरोप काढण्यात आले. अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री असलेले पी.के. थुंगन यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कट, भ्रष्टाचार आदी आरोप ठेवण्यात आले होते. थुंगन यांना १९९८ सालातील केंद्रीय निधीच्या गैरवापराबद्दल गेल्या वर्षी साडेचार वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. त्यामुळे ते तुरुंगातच आहेत. त्यांच्या शिक्षेबाबत उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहेत.सीबीआयने थुंगन आणि शीला कौल या दोघांनी सार्वजनिक सेवक या नात्याने अप्रामाणिकपणे, भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून आणि कटकारस्थान रचून दिल्लीत सरकारी दुकानांच्या गाळ्यांचे वितरण केले, असा आरोप ठेवला होता.