शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

व्यापमंच्या वादग्रस्त माजी अध्यक्षाची फोनवरून नियुक्ती

By admin | Updated: July 16, 2015 04:38 IST

सध्या देशभर गाजत असलेला मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळातील घोटाळा (व्यापमं घोटाळा) उघड होऊन त्याचा तपास सुरु झालेला असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

भोपाळ: सध्या देशभर गाजत असलेला मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळातील घोटाळा (व्यापमं घोटाळा) उघड होऊन त्याचा तपास सुरु झालेला असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या मंडळाच्या वादग्रस्त माजी अध्यक्षांची परदेशातून फोन करून राज्य वित्त आयोगावर सदस्य म्हणून घाईगर्दीने नेमणूक केल्याचे आरटीआयद्वारे उघड झाले.या घोटाळ््याचा पर्दाफाश करणारे ‘व्हिसलब्लोअर’ अजय दुबे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज करून मिळविलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात गुंतवणूक आणण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री चौहान यांनी तेथून फोन करून व्यापमंचे माजी अध्यक्ष मलय राय यांना राज्य वित्त आयोगावर सदस्य म्हणून नेमण्याचे आदेश दिले.मलय राय हे सन २००९-१० या काळात व्यापमंचे अध्यक्ष होते व घोटाळ््याच्या तपासात त्यांना अद्याप ‘क्लीन चिट’ मिळालेली नाही. व्यापमं घोटाळा २०१३ मध्ये सर्वप्रथम उघड होऊन त्याचा तपासही सुरु झाला होता. मुख्यमंत्री चौहान यांनी ६ जून २०१४ रोजी दक्षिण आफ्रिकेतून फोन करून मलय राय यांना वित्त आयोगावर नेमण्याचे तोंडी आदेश दिले व परत आल्यावर नंतर औपचारिक नियुक्ती आदेशावर स्वाक्षरी केली, असे दुबे यांनी मिळविलेल्या माहितीवरून दिसते. एवढ्या घाईघाईने नेमणूक करण्याचे काय कारण होते? की मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव होता?