शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी अधिकाऱ्याकडे ४०० कोटींचे घबाड

By admin | Updated: June 11, 2017 04:44 IST

प्राप्तिकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हेगारी चौकशी शाखेने एका कंपनीची ४०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. ही कंपनी नागालॅण्डमधील

कोची : प्राप्तिकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हेगारी चौकशी शाखेने एका कंपनीची ४०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. ही कंपनी नागालॅण्डमधील माजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. के. आर. पिल्लई यांच्या मालकीची असून, त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदकही मिळालेले आहे हे विशेष. पिल्लई नागालॅण्डमधील राजकीय नेते आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे मुखवटा म्हणून काम करीत असावेत, असा प्राप्तिकर विभागाला संशय असून, याबाबत पिल्लई यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी निधी विशेष करून केंद्राकडून राज्याला मिळालेला निधी बेकायदेशीररीत्या वळवून नंतर पिल्लई यांच्यामार्फत तो हस्तांतरित करण्यात आला किंवा काय, याची चौकशी करण्यात येत आहे. पिल्लई यांची श्रीवळसम ग्रुप ही कंपनी संशयास्पद आर्थिक व्यवहारात गुंतली असल्याचा संशय आल्यानंतर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी केरळ, कर्नाटक, नागालॅण्ड आणि दिल्ली येथे एकापाठोपाठ धाडी टाकल्या. नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर पिल्लई यांनी त्यांची ५० कोटींची मालमत्ता घोषित केली होती. पिल्लई यांनी घोषित केलेली मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नाहून अधिक असल्याचे आढळून आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरू केली. १९७१ मध्ये नागालॅण्ड पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झालेले पिल्लई सहा वर्षांपूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदावरून निवृत्त झाले होते.